Shyam Manav Astrology Challenge : भेंडवळ भाकितावर थेट सवाल! ज्योतिषशास्त्रानं 90% अचूकता सिद्ध करा, 80 लाखांचे बक्षीस तयार

Anti-superstition leader Shyam Manav challenges Bhendwal prediction and astrology, announces ₹80 lakh reward for proven accuracy : अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष शाम मानव यांनी भेंडवळ भाकि‍तासह ज्योतिषशास्त्राच्या अचूकता सिद्ध करणाऱ्यांना लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
Shyam Manav Astrology Challenge
Shyam Manav Astrology ChallengeSarkarnama
Published on
Updated on

Anti superstition Maharashtra news : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ भाकीत आणि कुंडली अन् पारंपारिक ज्योतिषशास्त्राच्या अचूकतेवर अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष शाम मानव यांनी पुन्हा एकदा चॅलेंज केलं आहे. वर्तवणाऱ्या भविष्यांची अचूकता 90 टक्के सिद्ध करा अन् 80 लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा, असे खुले चॅलेंज दिलं आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनचे अध्यक्ष शाम मानव यांनी, “10 कुंडल्या आणि सध्याची माहिती देऊ, त्यापैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त भविष्यवाणी अचूक ठरवून दाखवा,” असे आव्हान दिले आहे. ते सिद्ध झाल्यास तब्बल 80 लाखांचे बक्षीस देऊ, असे म्हटलं आहे.

शाम मानव यांनी पुढे म्हटलं आहे की, आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित आहेत. त्या पडताळून पाहता येतात. मात्र भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तितकी शास्त्रीय पडताळणी होत नाही. पूर्वी शेतकरी (Farmer) अनुभवावर निर्णय घेत होते. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शाम मानव यांनी या वेळी काही धार्मिक व पारंपरिक प्रथांवरही टीका केली. “लोकांना फसवण्यासाठी (Fraud) श्रद्धेचा वापर होतो,” असा आरोप करत, या प्रथांविरोधात जागृतीची गरज आहे.

Shyam Manav Astrology Challenge
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात एकनाथ शिंदेंचीही चौकशी होणार? 2022 मधील विखे पाटील, केसरकरांसोबतचा दौरा वादात

भेंडवळची परंपरा

दरम्यान, बुलढाणा इथं अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर भेंडवळ भाकी‍त पाहिलं जातं. याला साडेतीनशे वर्षांचा परंपरा आहे. त्यावर देखील शाम मानव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हे भाकीत जुळवून दाखवा, त्यांनीही बक्षीस घेऊन जावा, असे म्हटलं आहे.

Shyam Manav Astrology Challenge
Fake Baba Ashok Kharat Nashik Case : महिलांच्या शोषणात भोंदूगिरीचा ‘खरात पॅटर्न’? रंजना गवांदेंनी मांडली धक्कादायक आकडेवारी...

भेंडवळचं भाकीत

देशाचा राजा पदावर कायम राहिल. मात्र ताण आणि दबाव वाढलेला राहील. देशाच्या संरक्षण व्यवस्थेवरही मोठा ताण राहील. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. शेतीसाठी आव्हानात्मक वर्ष ठरू शकते. पिकांवर रोगराईचे वाढणार आहे.

भाकिताला चॅलेंज

भेंडवळच्या या घटमांडणीवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातून हजारो शेतकरी येथे येऊन हे भाकीत ऐकतात आणि त्यानुसार पुढील हंगामाचे नियोजन करतात. पण शाम मानव यांच्या प्रतिक्रियेनुसार याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे भाकीत अचूक ठरवावे, असे चॅलेंज त्यांनी दिलं आहे.

महिला सर्वाधिक बळी

सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात, संगमनेरमधील गडगे महाराजासह काही ढोंगीबाबांचं प्रकरण गाजत आहेत. विशेष करून, अशा भोंदूबाबांना महिला अधिक बळी पडत अशल्याचे समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com