Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीचा 'फाईव्ह-स्टार' थाट; मुख्यमंत्र्यांसह मंत्री अन् सचिव यांच्या अलिशान वास्तव्याची सोय...

Cabinet Meeting in Chhatrapati Sambhajinagar City : शासकीय विश्रामगृहाऐवजी मुख्यमंत्री शिंदेंचा पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य..
Cabinet Meeting in Chhatrapati Sambhajinagar City
Cabinet Meeting in Chhatrapati Sambhajinagar CitySarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उद्या (दि.१६ सप्टेंबर) राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मात्र आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारने मोडीत काढली आहे. आजवर झालेल्या मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचा मु्क्काम हा सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र एकनाथ शिंदे यांचा मुक्काम ३२ हजार रूपये भाडे असलेल्या अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे. यामुळे याची आता जोरदार चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Cabinet Meeting in Chhatrapati Sambhajinagar City
MP Supriya Sule Demand : दुष्काळ, आरक्षणाच्या प्रश्नावर स्वतंत्र अधिवेशन बोलवा..

महाराष्ट्राचा मागील इतिहास पाहता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सरकारी विश्रामगृहात असायचा. यंदाचं चित्र कदाचित वेगळे असण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रूम्स बुक करण्यात आले आहेत. रामा हॉटेसमधील एकूण ३० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्री या काळात वास्तव्य करणार आहेत. तसेच, शहरातील ताज हॉटेलमध्ये ४० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व सचिव वास्तव्य करतील.

Cabinet Meeting in Chhatrapati Sambhajinagar City
Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक : अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता

अमरप्रीत हॉटेलमध्ये ७० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी वास्तव्य करणार आहेत. अजंता अँबेसडेर हॉटेलमध्ये इथेही ४० रूम बुक आहेत. येथे उपसचिव आणि खासगी सचिव राहतील. तर महसूल प्रबोधिनीमध्ये १०० रूम्स बुक आहेत. येथे सुरक्षा रक्षक, वाहनचालक यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पाटीदार भवनात १०० रूम बुक केले आहेत इथेही सुरक्षा रक्षक, वाहनचालक राहतील.

बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून दीडशे वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. जेवणाच्या सोयीसाठी नम्रता केटरर्सला कंत्राट दिले आहे. यातील जेवणाच्या थाळ्यांचा दर १ हजार ते दीड हजार रूपयांपर्यंत आहे. त्यामुळे पंचतारांकित पद्धतीने मंत्रिमंडाळाची एका दिवसाची बैठक पार पडणार आहे. असा मोठा खर्च केल्याने शासकीय पैशांची हॉटेल्सवरती मोठी उधळपट्टी करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com