MLA Narayan Kuche News: कुचेंचे नशीब कराडांपेक्षा भारी, साडेसात कोटींच्या म्हाडाच्या घराची लाॅटरी..

Mhada Lottery News : मुकुंदवाडीतील या नगरसेवकाला थेट बदनापूर विधानसभेची उमेदवारी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात कुचे आमदार झाले.
Mla Narayan Kuche News
Mla Narayan Kuche NewsSarkarnama

Marathwada News : राजकारणात नशीब कधी कुणाला कुठे घेऊन जाईल याचा नेम नाही. आता हेच पहा ना, भाजपमधील अंतर्गत गटबाजीतून नगरसेवक, महापौर राहिलेल्या डाॅ. भागवत कराड यांचे नशीब फळफळे आणि ते थेट राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. पण एवढ्यावरच थांबायचे नाही, असे नशीबाने ठरवले होते म्हणूनच अवघ्या काही महिन्यात कराड थेट केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री झाले. राजकारणात कुणालाही हेवा वाटावा असा हा त्यांचा राजकीय प्रवास.

Mla Narayan Kuche News
Rohit Pawar Press : भाजप बिथरलाय म्हणूनच कुटुंब, पक्ष फोडण्याचे उद्योग ; रोहित पवार कडाडले..

पण एका बाबतीत मात्र त्यांना नशीबाने दगा दिला. तो म्हणजे मुंबईत खासदार आमदारांसाठी राखीव असलेल्या एकमेव म्हाडाच्या फ्लॅटच्या लाॅटरीत. कराड यांच्याच पक्षातील जालन्याच्या बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांना ही म्हाडाच्या फ्लॅटची लाॅटरी लागली आहे. विशेष म्हणजे कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी देखील या फ्लॅटसाठी अर्ज केला होता. पण यावेळी नशीब कुचे यांच्या बाजूने होते हेच यावरून स्पष्ट झाले.

मुंबईच्या ताडदेव भागातील म्हाडाच्या इमारतीमधील पंधराशे चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत तब्बल साडेसात कोटी रुपये आहे. उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या या फ्लॅटसाठी सोमवारी (ता.१४) रोजी सोडत काढण्यात आली होती. (BJP) या सोडतीत हा राखीव फ्लॅट कुचे यांना मिळाला. या फ्लॅटच्या खरेदीसाठी कुचे हे गृह कर्ज काढणार असल्याचे सांगितले जाते. आपल्या नावावर एकही घर नसल्यामुळे आपण म्हाडाच्या फ्लॅटसाठी अर्ज केला होता, असे ते सांगतात.

नारायण कुचे हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील मुकुंदवाडी या राखीव वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दोनवेळा ते नगरसेवक होते, दरम्यान, २०१४-१५ मध्ये ते स्थायी समितीचे सभापती देखील होते. स्वप्नात देखील आपण आमदार होऊ, असे त्यांना कधी वाटले नसले. पण म्हणतात ना, `उपरवाला जब देता है तो छप्पर फाड के`, असंच काहीस कुचे यांच्या बाबतीत देखील घडल. बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसिचित जाती एससी प्रवर्गसाठी राखीव झाला. २०१४ ची निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपकडे या मतदारसंघासाठी उमेदवारच नव्हता.

मग अचानक शोधाशोध सुरू झाली आणि नारायण कुचे यांच्यापाशी येऊन हा शोध थांबला. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुकुंदवाडीतील या नगरसेवकाला थेट बदनापूर विधानसभेची उमेदवारी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात कुचे आमदार झाले. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भरघोस निधीही मिळाला आणि २०१९ ची उमेदवारीही पक्की झाली. पाच वर्षाच्या राजकीय अनुभवातून आणि दानवेंचा हात पाठीवर असल्याने कुचे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले. अनेकदा ते वादातही सापडले, पण त्याचा त्यांना फारसा फटका बसला नाही. आता म्हाडाच्या फ्लॅटची लाॅटरी लागल्याने कुचे पुन्हा चर्चेत आले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com