Chhatrapati sambhajinagar Constituency : आधी तुळजाभवानीला साकडे, आता वैष्णोदेवीचे दर्शन.. खैरे यांना देव पावणार का?

Shivsena Politics: संभाजीनगरकरांची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या खैरे यांना मतदार दिल्लीत जाण्याची शेवटची संधी देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Chandrakant Khaire
Chhandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान पार पडले. महायुतीचे संदिपान भुमरेविरुद्ध महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यात अटीतटीची लढत असून संभाजीनगरात धनुष्यबाण की मशाल ? यावर गेल्या दोन आठवड्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत संभाजीनगरकरांची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या खैरे यांना मतदार दिल्लीत जाण्याची शेवटची संधी देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान धार्मिक वृत्तीचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khiare) यांनी मतदान झाल्यापासून देवाचा धावा केल्याचे दिसून येत आहे.

मागच्या आठवड्यात खैरे यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानीला विजयासाठी साकडे घालत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाल्यास सगळ्यांना सोबत घेऊन खणा नारळाने ओटी भरेल, असा नवस खैरे यांनी बोलला होता. त्यानंतर आता ते थेट वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी जाहीर होणार आहे. त्याआधी केलेले देवदर्शन खैरेंना पावणार का? अशी चर्चा होताना दिसते आहे. 2019 च्या निवडणुकीत पाचव्यांदा निवडणूक मैदानात असलेल्या खैरे यांना आपल्याच पक्षातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या बंडखोरीचा फटका बसला होता. हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्यामुळे एमआयएमची इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) हे अवघ्या साडेचार हजार मतांनी निवडून आले होते.

शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगरमधील हा पराभव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाची परतफेड शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत सव्याज केली. हर्षवर्धन जाधव यांचा तर शिवसेनेने दारुण पराभव केलाच परंतु जिल्ह्यातील सहाही जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकत रेकॉर्ड केला होता. राज्यात शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर ही पहिली लोकसभेची निवडणूक होत आहे.

या निवडणुकीत गद्दार विरुद्ध एकनिष्ठ असा प्रचार करण्यात आला होता. महायुती, महाविकास आघाडी, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी या चार प्रमुख उमेदवारांच्या भोवती यंदाची निवडणूक फिरणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार हे येणाऱ्या 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्याआधी देवावर श्रद्धा असलेले चंद्रकांत खैरे विजयासाठी साकडे घालताना दिसत आहेत.

(Edited By : Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com