Chandrakant Khaire News : आम्ही २८ वर्ष शांत ठेवलेले शहर एमआयएम-भाजप पुन्हा पेटवू पाहत आहेत..

Shivsena : नामांतराच्या विषयावरून शहरातील वातवरण खराब करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्यांना उत्तर देवू.
Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News
Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : मी शहराचा आमदार आणि जिल्ह्याचा खासदार असतांना या शहरात कधी दंगल घडू दिली नाही. २८ वर्ष शांत ठेवत बंधुभाव आम्ही कायम ठेवला. पण २०२८ मध्ये एमआयएममुळे शहरातील राजाबाजार भागात दंगल घडली होती. एमआयएम आल्यापासूनच शहरातील वातावरण बिघडत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला.

Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News
Jalna Loksabha Constituency : तीन पक्ष एकत्र लढले तरी दानवेंना `चकवा` देणे अशक्य..

छत्रपती संभाजीनगर नाव बदलल्यानंतर भविष्यात काही राजकीय फायदा होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजपचे मंत्री डाॅ. भागवत कराड (Bhagwat Karad) आणि एमआयएम (Aimim) राजकारण करत असल्याचा दावाही खैरे यांनी केला. गुडीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या भव्य शोभायात्रेची माहिती देण्यासाठी खैरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.

यावेळी शहरातील वातावरण, नामांतराच्या विषयावर बोलतांना खैरे म्हणाले, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे, आता सगळ्यांनी ते स्वीकारून शांत राहिलं पाहिजे. पण भाजप आणि एमआयएम याविषयावरून शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे. आम्ही २८ वर्षात या शहरात एकही दंगल होवू दिली नाही. २०१८ मध्ये जी दंगल झाली ती एमआयएममुळे झाली होती.

Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News
Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून ? ; दोघेही उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहताहेत..

राज्यसभेवर खासदार असलेल्या डाॅ. भागवत कराड यांना आता लोकसभा लढवण्याची इच्छा झाली आहे, त्यामुळे एमआयएमला जवळ करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण ते शक्य होणार नाही. नामांतराच्या विषयावरून शहरातील वातवरण खराब करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्यांना उत्तर देवू. उद्योजकांमध्ये, सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

त्यामुळे नामांतरावरून सुरू असलेल्या राजकारणात आम्हाला अजिबात रस नाही. आजच्या मोर्चात देखील आम्ही सहभागी होणार नाही. तो मोर्चा पुर्णतः राजकीय असल्याचा आरोप देखील खैरे यांनी केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीने पाडले, तसेच राज्यातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न देशपातळीवरून सुरू असल्याचा आरोप देखील खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com