Chandrakant Patil News : नॅक संलग्नतेसाठी मुदतवाढ मागितली तीन वर्षांची , मंत्र्यांनी दिली तीन महिन्यांची..

Kapil Patil : विक्रम काळे यांनी जुलैपर्यंत मुदतवाढ द्या, अशी मागणी केली, जुलैला का मुहूर्त आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.
Mla Kapil Patil-Minister Chandrakant Patil News
Mla Kapil Patil-Minister Chandrakant Patil NewsSarkarnama

Vidhan Parisad : राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयांना नॅक संलग्नतेसाठी तीन वर्षांची मुदतवाढ द्या, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात केली. यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मात्र फक्त तीन महिन्यांची म्हणजे चालू शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी नॅकची नोंदणी करून घ्या, असे स्पष्ट आदेश सभागृहात दिले.

Mla Kapil Patil-Minister Chandrakant Patil News
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मोदी-शहांकडे वजन वापरा...

मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे विक्रम काळे यांनी या चर्चेत सहभाग घेतला. (Kapil Patil) कपिल पाटील यांनी लक्षवेधी मांडत नॅकच्या संलग्नतेसाठी महाविद्यालयांना आणखी तीन वर्षांची मुदत वाढ देण्याची मागणी करतांनाच विनाअनुदानित संस्था महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी परवानगी नसल्याचे कारण सांगितले.

त्यामुळे नॅक नोंदणीच्या निकषानूसार महाविद्यालयांना पात्र होता येत नाही.कोरोना काळामुळे महाविद्यालचे पाच वर्ष मागे गेली आहेत. फी जमा झालेली नाही. नॅक मुल्यांकनासाठी महाविद्यालयांना मोठी तयारी करावी लागले, खर्च करावा लागतो. शिवाय नॅकच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कार्यकारी अध्यक्षांनी नॅकमधील भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थीत केला.

यावर विक्रम काळे, सतीश चव्हाण यांनी नॅक नोंदणीसाठी अडीच लाख रुपयांचे शुल्क भरण्यास महाविद्यालये असमर्थ आहेत. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या फी माफीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने ती परत महाविद्यालयांना मिळण्यासाठी बराच कालावधी जातो, असे मुद्दे उपस्थितीत करत नॅक रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ द्यावी, आमचा नॅकला विरोध नाही, अशी भूमिका मांडली.

यावर उत्तर देतांना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अकराशे महाविद्यालयांनी नॅक संलग्नतेसाठी नोंदणी केलेली आहे. तर यापैकी पाचशे विद्यालयांनी दुसऱ्यांदा नॅकचे मुल्यांकन करून घेतले.कपिल पाटील यांनी भरती नसल्याचे एक कारण पुढे केले आहे, परंतु नॅक मुल्यांकनात याशिवाय दहा ते बारा वेगवेगळ्या मुद्यांचा समावेश आहे. त्यामुळे भरतीचे कारण देत नॅकचे मुल्यांकन किंवा नोंदणी टाळता येणार नाही.

Mla Kapil Patil-Minister Chandrakant Patil News
MNS News: मनसेची `स्वप्नपुर्ती`, पोलिसांनी रोखली, मोर्चामुळे तणाव अन् धरपकड..

विक्रम काळे यांनी जुलैपर्यंत मुदतवाढ द्या, अशी मागणी केली आहे, पण जुलैला का मुहूर्त आहे का? असा सवाल पाटील यांनी केला. नॅकची नोंदणी महाविद्यालयांनी करावी, मुल्याकंनासाठी त्यांना पुढे भरपूर वेळ आहे, पण रजिस्ट्रेशन करणे बंधनकार आहे. नॅकचे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरु करता येणार नाही, असे स्पष्ट करतांनाच चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधी सर्व महाविद्यालयांना नॅक रजिस्ट्रेशन करावे, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com