BJP NEWS : बीड जिल्ह्यातून २०१४ मध्ये भाजपचे बहुतांश आमदार आणि खासदार निवडून आले आणि राज्यात आपले सरकार आले. पण २०१९ मध्ये बीडमध्ये काही ठिकाणी ॲक्सिडेंट झाले. पण २०२४ मध्ये ॲक्सिडेंट होणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवावर भाष्य केले. (Chandrashekhar Bawankule's commentary on Pankaja Munde's defeat)
भाजपचे बीड (Beed) जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या पराभवासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले की, बीडचा पुढचा आमदार शिवसेना-भाजप युतीचा असला पाहिजे. बीडमध्ये शतप्रतिशत आपले आमदार आणि खासदार असले पाहिजेत. गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये शतप्रतिशत भाजपचा नारा दिला होता.
बीडमध्ये २०१४ मध्ये आपले बहुतांश आमदार आणि खासदार निवडून आले आणि राज्यात आपले सरकार आले. पण २०१९ मध्ये बीडमध्ये काही ॲक्सिडेंट झाले. पण २०२४ मध्ये काही ॲक्सिडेंट होणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, असेही प्रदेशाध्यक्षांनी नमूद केले.
बावनकुळे म्हणाले की, राजेंद्र म्हस्के यांनी सांगितलेली कामे करण्यासाठी भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी वकिली करेन आणि पंकजा मुंडे जे ठरवतील, त्याप्रमाणे बीड जिल्ह्यात सर्वकाही होईल. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील बैलगाडा संपूर्णपणे जिंकल्याशिवाय राहणार नाही. पंकजा यांना बीड जिल्ह्याची नस ना नस माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याचे चित्र संपूर्णपणे बदलल्याशिवाय राहणार नाहीत. कारण (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी केलेले काम आपल्या पाठीशी उभे आहे.
बैलगाडा शर्यतीला पुढच्या वर्षी ट्रॅक्टर बक्षीस ठेवा....
बैलगाडा शर्यतींसाठी या वर्षी मोटारसायकल पहिले बक्षीस ठेवण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनी थोडी मदत करावी, पुढच्या वर्षी पहिलं बक्षीस ट्रॅक्टर ठेवा. त्या ट्रॅक्टरला थोडा हातभार मी लावेन, थोडा जास्त हातभार पंकजाताई लावतील. त्यानंतर प्रीतमताई शेवटचा हात आपला असेल, असे म्हणत बावनकुळे यांनी राजेंद्र म्हस्केंना मदत करण्याचे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.