OBC Reservation News : लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांचा पाठिंबा..

Chhagan Bhujbal and Pankaja Munde support Laxman Hake Protest : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी हाके यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
Chhagan Bhujbal and Pankaja Munde
Chhagan Bhujbal and Pankaja MundeSarkarnama

Jalna Latest Politics : मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण स्थगित झाले असले तरी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून प्रा. लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असल्याचे त्यांची प्रकृती खालावली असून, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी हाके यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विट करत सरकारने लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, असे म्हटले आहे. तर छगन भुजबळ यांनी हाके यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे थेट फोन करून सांगितले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष गेल्या काही महिन्यापासून राज्यभरात सुरू आहे.

एकीकडे कुणबी जातीच्या प्रमाणपत्रा आधारे सगेसोयरे यांच्यासह मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित करत सरकारला निर्णयासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. तर दुसरीकडे अंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

Chhagan Bhujbal and Pankaja Munde
Jaidatta Kshirsagar Vs Sandeep Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत येणार? संदीप क्षीरसागरांनी केला मोठा दावा

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी ट्विट करत या उपोषणावर भाष्य केले. प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे, असे म्हटले आहे.

तर तिकडे राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत तातडीने समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. वांद्रेमधील एमईटी संस्थेच्या संकुलात ही बैठक सुरू असतानाच भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Chhagan Bhujbal and Pankaja Munde
Ashok Chavan News : निवडणुकीमध्ये हार-जीत होते, आम्ही कमी पडलो; अशोक चव्हाणांनी सांगितले पराभवाचे कारण

दरम्यान, सरकारच्यावतीने हाके यांच्या भेटीसाठी खासदार संदीपान भुमरे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांनी भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली. ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक होणार आहे. यावेळी सदर मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन या शिष्टमंडळाने हाके व आंदोलकांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com