Chhatrapati Sambhaji Nagar Constituency : ठाकरेंच्या एकनिष्ठ आमदाराच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळणार का?

Lok Sabha Election 2024 : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत आमदार उदयसिंह राजपूत यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा 18 हजार 690 मतांनी पराभव केला होता. शिवाय आतापर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराला कन्नडमधून कायम लीड मिळत आलेली आहे.
Mla Udaysingh Rajput- Chandrakant Khaire
Mla Udaysingh Rajput- Chandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati SambhajiNagar : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया तीन टप्प्यात पूर्ण झाली. तेव्हापासून महायुती-महाविकास आघाडी, वंचित सह अपक्षांनीही आकडेमोड सुरू करत निवडणुकीत आपला अंदाज लावायला सुरूवात केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे विरुद्ध महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यात लढत आहे.

या निमित्ताने महायुतीचे सर्वाधिक आमदार असलेल्या या मतदारसंघात शिंदे गटाच्या बंडावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहिले आमदार म्हणजे कन्नड-सोयगावचे उदयसिंह राजपूत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा संभाजीनगर दौऱ्यावर भुमरेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. यावेळी केलेल्या शक्ती प्रदर्शनात शिंदेंनी आवर्जून कन्नड मतदारसंघाचा उल्लेख करत यावेळी उदयसिंह राजपूत यांचा टांगा पलटी करणार ना? असे म्हणत त्यांना लक्ष्य केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mla Udaysingh Rajput- Chandrakant Khaire
Marathwada Political News : स्वातंत्र्यापासून मराठवाड्यातील 'या' मतदारसंघांना लाभल्या नाहीत महिला खासदार!

या पार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (MahaVikas) उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी किती मताधिक्य मिळते? याकडे लागले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजपूत यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा 18 हजार 690 मतांनी पराभव केला होता. शिवाय आतापर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराला कन्नडमधून कायम लीड मिळत आलेली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांना तब्बल 2 लाख 83 हजार मते मिळाल्याने खैरे यांचा पराभव झाला होता. जाधव यांच्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यावरचा भगवा झेंडा उतरला, असा आरोप त्यांच्यावर केला गेला. याचा परिणाम त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांच्या पराभवात झाला.

Mla Udaysingh Rajput- Chandrakant Khaire
Manoj Jarange Patil News : मनोज जरांगेंसाठी ठाकरेंचा खासदार मैदानात; म्हणाले, "मराठा समाजाने..."

उदयसिंह राजपूत यांनी दोन वेळा आमदार राहिलेल्या जाधव यांना धूळ चारली होती. राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले तेव्हा उदयसिंह राजपूत यांना फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते, परंतु 25 वर्षानंतर ज्या शिवसेनेने त्यांना आमदार केले त्या पक्षाशी गद्दारी करणार नाही, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

Mla Udaysingh Rajput- Chandrakant Khaire
Manoj Jarange News : मनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, जमावाची तरुणाला बेदम मारहाण

संभाजीनगर जिल्ह्यात ते ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघ जिंकायचाच, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कन्नड मतदारसंघातील मतदार उद्धवसेनेचेच्या पाठीशी आहेत, की शिंदेसेनेच्या हे ही स्पष्ट होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कन्नड-सोयगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नातून चंद्रकांत खैरे यांना मताधिक्य मिळेल, असा विश्वास उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा विश्वास किती खरा किती खोटा? हे चार जूनच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

(Edited by : Chaitanya Machale)

Mla Udaysingh Rajput- Chandrakant Khaire
Danve On PM Modi : मोदी अन् भाजपचे प्रेम कधीच निर्मळ नव्हते, दानवे असं का म्हणाले ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com