Sambhaji Nagar: महानगर पालिकेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीचाही धुराळा!

Zilla Parishad Election : महानगरपालिकेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, आरक्षण सोडतीमुळे राजकीय समीकरणे बदलत ग्रामीण राजकारण तापले आहे.
Political leaders and party workers gearing up after the announcement of Zilla Parishad and Panchayat Samiti election schedule in Chhatrapati Sambhaji Nagar district.
Political leaders and party workers gearing up after the announcement of Zilla Parishad and Panchayat Samiti election schedule in Chhatrapati Sambhaji Nagar district.Sarkarnama
Published on
Updated on

-संदीप लांडगे

Chhatrapati Sambhaji Nagar news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, आरक्षण सोडतीनंतर आता प्रत्यक्ष निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 63 गट व 126 गण असून, 850 ग्रामपंचायतींच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी खुले झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गज नेत्यांचे गणित कोलमडले असून, काही नव्या व माजी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. माजी अध्यक्षा मीना शेळके, माजी उपाध्यक्ष केशव तायडे, माजी सभापती किशोर बलांडे तसेच भाजपचे एल.जी. गायकवाड व रमेश गायकवाड यांचे गट राखीव ठरल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत.

दुसरीकडे, श्रीराम महाजन, विनोद तांबे, पुनम राजपूत, वैशाली पाटील, संदीप सपकाळ, प्रकाश चांगुलपाये, पंकज ठोंबरे, जितेंद्र जैस्वाल, अविनाश गलांडे व रमेश पवार यांसारख्या अनुभवी माजी सदस्यांना पुन्हा मैदानात उतरता येणार आहे. या आरक्षण प्रक्रियेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना मिळालेला वाढता राजकीय वाव.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गांमध्ये महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर गट राखीव ठेवण्यात आले असून, तब्बल 32 महिला सदस्य जिल्हा परिषदेच्या ‘मिनी मंत्रालयात’ प्रवेश करणार आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्त्री नेतृत्व अधिक बळकट होणार आहे. सोडत जाहीर झाल्यानंतर काहींच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. ज्यांचे गट राखीव राहीले नाहीत, ते आनंदित होते, तर ज्यांचे गट बंद झाले, ते निराश झाले होते. त्यामुळे आता ते नेते पंचायत समित्यांकडून आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

सामाजिक समीकरणे बदलणार..

आरक्षणामुळे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (दोन्ही गट) रणनीतींवर थेट परिणाम झाला आहे. सत्ताधारी भाजप प्रशासनिक प्रभावाच्या जोरावर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार असला, तरी ग्रामीण भागातील सामाजिक समीकरणे हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे. काँग्रेस पारंपरिक मतदारसंघ आणि संघटनशक्तीवर भर देत पुनरागमनाचा प्रयत्न करणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांमध्ये थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेसाठी 63 गट, तर पंचायत समितीसाठी 126 गण निश्चित करण्यात आले आहेत. ओबीसीसाठी 17, अनुसूचित जातीसाठी 10, अनुसूचित जमातीसाठी 3 गट आरक्षित असतील. 35 गट खुल्या प्रवर्गासाठी असतील. एकूण 32 जागांवर महिला आरक्षण असेल. त्यापैकी अनेक महिलांसाठी राखीव असल्याने स्थानिक राजकारणात नव्या पिढीचे आणि स्त्री नेतृत्वाचे आगमन निश्चित आहे.

एकूणच, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत केवळ जागांची विभागणी नसून, ती राजकीय भविष्याचा नवा आराखडा ठरली आहे. येत्या 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज, हरकती आणि प्रचार यामुळे जिल्ह्याचे राजकीय तापमान शिगेला पोहोचणार आहे. राज्याच्या ‘मिनी मंत्रालयात’ कोण पुन्हा झेंडा फडकवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Political leaders and party workers gearing up after the announcement of Zilla Parishad and Panchayat Samiti election schedule in Chhatrapati Sambhaji Nagar district.
Chhatrapati Sambhajinagar Election: धक्कादायक! मतदारांची यादी तयार करून थेट पैशांचीच डील, अलर्ट नागरिकांनी डाव हाणून पाडला

2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 22 लाख 10 हजार 165 होती. त्यावरून 2017मध्ये गट व गण रचना करण्यात आली होती. त्यावेळी सरासरी 40 हजार लोकसंख्येचा एक गट, तर 20 हजार लोकसंख्येचा एक गण होता. 14 ते 18 गावांचा एक गट होता. गेल्या 14 वर्षांत लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे नव्याने गट व गण रचना करण्यात आली आहे.

निडणूकीतील महत्त्वाचे मुद्दे...

या निवडणूकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावे लागतील

- एक जिल्हा परीषदेसाठी द्यावे लागेल, एक पंचायत समितीसाठी द्यावे लागेल.

- राखीव जागांवर जातवैधता पडताळणी आवश्यक आहे.

- एखाद्या उमेदवाराकडे प्रमाणपत्र नसेल तर त्याने जातपडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

- निवडणून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्याची निवड रद्द होईल

Political leaders and party workers gearing up after the announcement of Zilla Parishad and Panchayat Samiti election schedule in Chhatrapati Sambhaji Nagar district.
Jalna Municipal Election : 'कल्याण'ला निवडून देऊन तुमंच काय कल्याण झालं? काम करूनही मला का पाडलं? महापालिका प्रचारात दानवेंनी स्वतःचंच दुःख मांडलं!

छत्रपती संभाजीनगर 10 गट, 20गण

  • तालुका :-------- गट ---- गण

  • छ. संभाजीनगर ---- 10 ---- 20

  • सोयगाव : ------ 3 ----- 6

  • सिल्लोड : ----- 9 ---- 18

  • कन्नड : ------- 8 ---- 16

  • फुलंब्री : ------ 4 ---- 8

  • खुलताबाद : ----3 ---- 6

  • वैजापूर : ----- 8 ---- 16

  • गंगापूर : ----- 9 --- 18

  • पैठण : ------- 9--- 18

  • एकूण : --- 63 ---- 126

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com