Uddhav Thackeray Shiv Sena: मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे सेनेची अशी आहे रणनीती

BMC Election 2025 Thackeray Vs Eknath Shinde:ठाकरे गटानं 'अदानीला घालवूया, मुंबईच्या अस्मितेसाठी लढूया' या मोहिमेला सुरुवात केली आहे. महिनाभर ही मोहीम सुरु राहणार आहे. मोहीमेच्या माध्यमातून ठाकरे सेना महायुतीला धारेवर धरणार आहे.
Shiv Sena Uddhav Thackeray
Shiv Sena Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BMC Election 2025: मुंबई महापालिका हा शिवसेनेचा आत्मा आहे, बीएमसी (BMC) ताब्यात ठेवणे, हा प्रमुख अजेंडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. बीएमसीवर पंचवीस वर्ष शिवसेनेनं अधिराज्य गाजवलं, मुंबई महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो कायम ठेवण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटानं आतापासूनच तयारी केली आहे. बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे सेना सज्ज झाली आहे.

'लढा आपल्या मुंबईचा'ही मोहीम हाती घेऊन शिवसैनिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली रणनीती अधिक स्पष्ट आणि आक्रमक केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने पुन्हा एकदा मराठी अस्मिता, हिंदुत्व, आणि महाविकास आघाडी या बळावर सत्ता मिळवण्याची मोहीम सुरु केली आहे.

ठाकरे गटानं 'अदानीला घालवूया, मुंबईच्या अस्मितेसाठी लढूया' या मोहिमेला सुरुवात केली आहे. महिनाभर ही मोहीम सुरु राहणार आहे. मोहीमेच्या माध्यमातून ठाकरे सेना महायुतीला धारेवर धरणार आहे.

मुंबईतील मराठी मतदार हा ठाकरे पक्षाचा डीएनए आहे. वर्षभरात मुंबईत मूळ मुंबईकरांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. हाच मुद्दा समोर घेऊन ठाकरे गट महायुतीला घेरणार आहे. मराठी माणसाच्या लढाईसाठी ठाकरे गट सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहे. थेट मतदारांच्या घरी पोहचण्याची रणनीती ठाकरे गट आखत आहे. मुंबईकरांना सत्ताधारी डावलत असल्याचा आरोप होत असताना याच मुद्दांवर ठाकरे सेना प्रचारात उतरणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही जपत आहोत, असा दावा शिंदे सेना करीत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे यांनी तयारी केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणांतून आणि जाहिरातींतून "आपलंच खऱं हिंदुत्व" हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या व्हिडिओ क्लिप्स, भाषणं यांचा वापर केला जात आहे.

मुंबईकरांशी संवाद साधण्यासाठी "लढा आपल्या मुंबईचा" ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यांचे नेतृत्व ठाकरे सेनेचे युवानेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे करीत आहेत. घरोघर पत्रके वाटप, महिलांची पदयात्रा,पोस्टकार्ड मोहीम,विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वॉर्डस्तरीय संघटन:प्रभाग सभांमध्ये संवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाकरे गटाचा BMC जिंकण्याचा मास्टरप्लॅन

  • मुळ मुंबईकरांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत.

  • आम्हीच हिंदुत्वाचा चेहरा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पुन्हा मांडणी.

  • महाविकास आघाडीसोबत लढण्याची शक्यता

  • मराठी मतदारांवर भर

  • "मराठी माणसाची लढाई" अशी भावना पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न.

  • शाखानिहाय मुख्य चौकात फलकबाजी आणि बैठका

  • शाखानिहाय मुख्य चौकात अदानींविरोधात फलकबाजी आणि बैठक

  • शाखानिहाय राष्ट्रपती यांना अदानी यांच्या विरोधात पोस्ट कार्ड पाठवणार

  • आषाढी एकादशी निमित्त महिला दिंडीचे आयोजन,अदानींना विरोध करणार

  • खासदार,आमदार यांच्या उपस्थितीत विधानसभानिहाय सामाजिक संस्था, वरिष्ठ

  • नागरीकांच्या बैठका

  • 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबतीत नागरिकांना माहिती देणे आणि पत्रक वाटप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com