Bazar Samiti : 'निवडणूक खर्च काढण्यासाठी बाजार समितीची जमीन बिल्डरच्या घशात...'

Market Committee News : वैजिनाथ काळे, शब्बीर पटेल, पंकज फुलपगर, राजू शिंदे यांनी सभपाती असताना सर्वोच्च न्यायालयात जाऊन जमीन वाचवली.
Haribhau Bagde
Haribhau BagdeSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Politics : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या सातबाऱ्यावर आलेली जळगाव रोडवरील गट नंबर 12 व 13 मधील 25 एकर जमीन तडजोडीच्या नावाखाली सभापती आणि त्यांचे संचालक मंडळ हे खासगी बिल्डरच्या घशात घालत आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे संचालक जगन्नाथ काळे यांनी केला आहे. आम्ही या प्रकाराला विरोध केला आहे. निवडणुकीत झालेला खर्च काढण्यासाठी सभापती पठाडे व सत्ताधारी संचालकांकडून हा सगळा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही काळेंनी केला.

काळे म्हणाले, बाजार समितीची (Chhatrapati Sambhajinagar Bazar Samiti) ही जमीन वडील वैजिनाथ काळे यांनी सभापती असताना सर्वोच्च न्यायालयात जाऊन वाचवली. यासह त्यानंतर सर्व सभापती शब्बीर पटेल, पंकज फुलपगर, राजू शिंदे हे सभपाती असताना त्यांनीही ही जमीन वाचवली. ही जमीन बाजार समितीकडेच राहावी, यासाठी आतापर्यंतच्या सभापती आणि संचालकांनी प्रयत्न केले. पण सत्तेसाठी निवडणुकीत केलेला घोडेबाजार, त्यासाठी आलेला खर्च वसूल करण्यासाठी सभापती आणि सत्ताधारी पक्षाच्या काही संचालकांनी बाजार समितीची ही जमीन खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे, असा घणाघातच काळेंनी केला.

Haribhau Bagde
PMC News : पुणे आयुक्तांचा भलताच 'विक्रम'; दहा दिवसांत काढली 291 टेंडर, आता कुणावर खापर फोडणार ?

बाजार समितीवर प्रशासक म्हणून माझी नेमणूक झाल्यानंतर ही जमीन न्यायालयाच्या आदेशाने बाजार समितीच्या सातबाऱ्यावर आणली. मात्र आताचे सभापती राधाकिसन पठाडे आणि त्यांचे सर्व संचालक हे जमीन तडजोडीच्या नावाखाली खासगी बिल्डरला देऊ पाहत आहेत. या संदर्भात जैसे थे परिस्थिती (स्टेटस्को) उठवण्यासाठी बाजार समितीने वकील पाठवला नाही. यासाठी केवळ 50 हजार रुपये खर्च येतो, हे सोडून एका सेवानिवृत्त न्यायधिशांचा सल्ला घेण्यासाठी 5 लाख रुपये खर्च केले. पण स्टेटस्को उठवला नाही, अशी माहितीही काळेंनी दिली.

Haribhau Bagde
Maratha Reservation : मंत्रिपदाचा कधीच राजीनामा दिलाय; भुजबळांनी जाहीरपणे सांगून टाकलं

ज्या बिल्डरने जिन्सीतील जमीन खरेदी केली पण पूर्ण पैसे न देता व्यवहार अपूर्ण ठेवला. त्याच बिल्‍डरला आता ही 25 एकर जमीन देण्याचा घाट घातला जात आहे. या कथित गैरव्यवहाराला आमदार हरिभाऊ बागडे यांचीही संमती असल्याचा आरोप जगन्नाथ काळेंनी केला. ही जमीन बाजार समितीने विकसित करावी किंवा राष्ट्रीयस्तरावरील वृत्तपत्रात जाहिरात देऊन निविदा मागवाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शेतकऱ्यांची ही जमीन खासगी बिल्डरच्या घशात जाण्यापासून वचविण्यासाठी अडचणीचा ठरणार स्टेटस्को उठविण्यासाठी मी स्वत: न्यायालयात गेलो आहे. ज्या स्टेटस्कोच्य भरवशावर हे लोक तडजोड करीत होते, तोच प्रश्‍न मी सोडवत ही जमीन वाचविणार असल्याचा दावाही जगन्नाथ काळे यांनी केला. या प्रकरणी आमदार बागडे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही काळे यांनी केले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयापेक्षा कोणीच मोठा नाही, ही जमीन बाजार समितीच्या नावावर असताना जिन्सीचा व्यवहार अपूर्ण ठेवणाऱ्या बिल्डरच्या घशात शेतकऱ्यांची जमीन घालण्यात येत आहे. ही घाई कशासाठी करण्यात येत आहे? ही जागा शेतकऱ्यांसाठी असावी, बाजार समितीने ती विकसीत करावी, अशी भूमिका संचालक अभिजीत देशमुख यांनी घेतली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Haribhau Bagde
BJP Politics : 'आधी कंगाल केले अन् आता मते मागता'; शेतकऱ्याने भाजपची लाजच काढली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com