Supreme Court : गुंड मोहोळचे कौतुक करणाऱ्या टी. राजांचे कार्यक्रम रोखण्यास कोर्टाचा नकार; जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

BJP MLA T Raja Singh : टी. राजा सिंह वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात...
T. Raja Singh
T. Raja SinghSarkarnama

New Delhi News : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यवतमाळमध्ये होणारा हिंदू जनजागृती समितीचा कार्यक्रम आणि छत्तीसगडमधील कार्यक्रम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खून झालेल्या गुंड शरद मोहोळचे टी. राजांनी कौतुक केले होते.

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) शाहीन अब्दुला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. यवतमाळमध्ये 18 जानेवारीला हिंदू जनजागृती समितीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला देण्यात आलेली परवानगी नाकारावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 19 ते 25 जानेवारी या कालावधीत छत्तीसगडमध्ये टी. राजा यांचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये भडकाऊ भाषणे होऊ शकतात, त्यामुळे कार्यक्रमांना दिलेली परवानगीही रद्द करावी, असेही याचिकेत म्हटले होते.

T. Raja Singh
Congress : माजी मुख्यमंत्र्यांचा दोन माजी खासदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

कोर्टाने परवानगी नाकारण्याची मागणी अमान्य करीत प्रशासनाला आदेश दिले. यवतमाळ (Yavatmal) व रायपूरच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी आवश्यक उपाययोजना करावी. गरज असल्यास कार्यक्रमाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत. कोणत्याही परिस्थितीत भडकाऊ भाषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, ‘कार्यक्रमांमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात आधीच गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू शकतात.’ मात्र, त्यानंतरही कोर्टाकडून कार्यक्रमांना मनाई करण्यास नकार दिला.

दरम्यान, टी. राजा यांनी काही दिवसांपूर्वीच सोलापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गुंड शरद मोहोळचा उल्लेख हिंदूत्वरक्षक असा केला होता. मोहोळचा खून झाल्यानंतरच काही दिवसांतच टी. राजांनी केलेल्या या विधानामुळे वाद निर्माण झाला होता.

R...

T. Raja Singh
Adam Mastar : 'रे नगरमुळे माझं डिपॉझिट जप्त झालं होतं' ; आडम मास्तरांनी सांगितली 'ती' आठवण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com