Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाची लोकसभेची तयारी; काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये उत्साह दिसेना...

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांची फारशी ताकद नाही. जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसचा एकही आमदार गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही.
Maha Vikas Aghadi
Maha Vikas Aghadisarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभेची तयारी सुरू केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत साडेतीन हजार मतांनी पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना पक्षाकडून पुन्हा मैदानात उतरवले जाणार असल्याची चर्चा आहे. खैरे यांचे मतदारसंघातील दौरे, धार्मिक व खासगी कार्यक्रमांना वाढलेल्या भेटीगाठी पाहता त्यांना पक्षाकडून उमेदवारीचे संकेत मिळाले असल्याचे बोलले जात आहे. पण खैरे कामाला लागलेले असताना काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या शिवसेनेच्या मित्र पक्षांमध्ये उत्साह दिसत नाही.

Maha Vikas Aghadi
Uddhav Thackeray News : 'सत्ताधाऱ्यांमध्ये गँगवाॅर, मिंदे गँग आणि फडणवीस गँग...' उद्धव ठाकरेंनी सुनावले

महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे असल्याने मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी(NCP) मात्र सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे. जागावाटपचा तिढा सुटल्यानंतर महाविकास आघाडी व वंचित या नव्या घटक पक्षासोबत लोकसभेच्या कामाला लागेल असे बोलले जाते. जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांची फारशी ताकद नाही. जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसचा एकही आमदार गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

जिल्हा परिषद, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीचा आकडा फारसा समाधानकारक नव्हता. त्यामुळे ठाकरे गटाला येणारी लोकसभा निवडणूक ही सहानुभूती आणि निष्ठेच्या जोरावरच लढावी लागणार आहे. मराठवाडा पदवीधर, मराठा शिक्षक मतदारसंघाचे अनुक्रमे सतीश चव्हाण, विक्रम काळे यांच्यामुळे शहरात राष्ट्रवादीचा थोडाफार प्रभाव होता. पण आता हे दोघेही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फारसा फायदा मते मिळवण्यासाठी होण्याची शक्यता फारच कमी आहे.

काँग्रेसची परिस्थिती राष्ट्रवादीपेक्षा बरी म्हणावी लागेल. कारण काँग्रेसकडे अजूनही पारंपारिक मतदार आहे. परंतु या पक्षालाही गेल्या कित्येक वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करता आलेली नाही. कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा असलेल्या काँग्रेसची सध्या दयनीय अवस्था आहे. एकही आमदार, खासदार नसल्याने काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची उणीव भासायला लागली आहे.

राज्यातील वरिष्ठ नेत्यांनीही जिल्ह्याच्या काँग्रेसकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी काँग्रेस फक्त नावाला उरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला पुन्हा सक्रीय होऊन उभारी घेण्याची संधी आहे. या संधीच सोनं स्थानिक नेते कसं करतात? त्यांना राज्याच्या नेत्यांकडून मदत मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

'वंचित'ची भूमिका महत्त्वाची

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला, तर इथे काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) पेक्षा ठाकरे गटाला 'वंचित'चा फायदा अधिक होऊ शकतो. या वंचित आणि एमआयएमच्या युतीमुळेच शिवसेनेचा खासदार गेल्या निवडणुकीत पडला होता. आता तीच वंचित आघाडी शिवसेनेला गेलेली खासदारकी मिळवून देऊ शकते.

(Edited By Roshan More)

Maha Vikas Aghadi
Jitendra Awhad : अजित पवारांच्या 'त्या' विधानावर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, "लाज वाटते तुमच्याबरोबर..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com