Ratan Padavi Join NCP : काँग्रेस नेते के सी पाडवींना धक्का; निकटवर्तीय रतन पाडवींचा अजित पवार गटात प्रवेश

Nandurbar Congress leaders : नंदुरबार जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Ratan Padvi
Ratan PadviSarkarnama

Nandurbar Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे. आपल्या पक्षाची ताकद राज्यभरात जास्तीत ठिकाणी कशी वाढवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दृष्टीने मोठ्याप्रमाणावर अन्य पक्षातील नेत्यांचे पक्षप्रेवश करून घेतले जात आहेत. तर आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळेल या आशेने इच्छुकही पक्ष बदल करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकासमंत्री डॉक्टर के सी पाडवी यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या नंदुरबार जिल्हा परिषदेचे सभापती रतन पाडवी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार(Ajit Pawar) गटात प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ratan Padvi
Bachchu Kadu Vs Sanjay Raut : राऊतांना काहीच कसे समजत नाही..! बच्चू कडू म्हणाले, 'त्यांनी सोमय्यांप्रमाणे...'

के.सी. पाडवी(KC Padavi) यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या रतन पाडवी यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष प्रवेश केला.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर झालेले या पक्षप्रवेशावरून काँग्रेसला(Congress) मोठा धक्का बसला आहे. तसेच यावेळी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावरून नंदुरबार जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे..

Ratan Padvi
Obc Elgar Melava : राम शिंदे, वडेट्टीवार एल्गार मेळाव्याला का आले नाहीत? काय आहे कारण?

तर काँग्रेसचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडी सरकारने आदिवासी मतदारसंघात विकासकामे मंजूर केली. त्या कामांना विरोधकांचे मतदारसंघ म्हणून स्थगिती देण्याचे काम भाजपच्या ट्रिपल इंजिन सरकारने केलं. आदिवासी जनता त्यांना धडा शिकवेल, या शब्दांत काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केलेला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com