Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी शिंदे - फडणवीसांचे टेन्शन वाढवले; बरेच बोलून मोकळे झाले

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महायुतीला राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेच्या जालना मतदारसंघातून सत्तार यांचे काँग्रेसमधील जुने मित्र कल्याण काळे निवडून आले आहेत.
Eknath Shinde, Abdul Sattar
Eknath Shinde, Abdul Sattarsarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महायुतीला राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेच्या जालना मतदारसंघातून सत्तार यांचे काँग्रेसमधील जुने मित्र कल्याण काळे निवडून आले आहेत. याबद्दल सत्तार यांनी आज त्यांचे घरी जाऊन अभिनंदन केले आणि त्यांना कडकडून मिठी मारली.

एवढेच नाही तर काळे माझे मित्र आहेत आणि लोकसभा निवडणुकीत मी त्यांना मदत केली, अशी कबुलीही सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. सत्तार एवढ्यावरच थांबले नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत त्यांच्याशी केलेला प्रासंगिक करार कायम राहील. ज्या दिवशी त्यांच्या माझ्यावरचा विश्वास उडेल तेव्हा मी योग्य निर्णय घेईन, असे सांगत खळबळ उडवून दिली.

त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून शिवसेनेसोबत असलेला प्रासंगिक करार ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुर्वी मोडतात का? यावर तर्क लढवले जात आहेत. अब्दुल सत्तार हे धुर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात. कायम सत्तेसोबत राहण्याचा त्यांचा अट्टाहास असतो.

राजकारणात बदलणाऱ्या घडामोडी आणि भविष्याचा अचूक अंदाज सत्तार घेतात आणि आपली राजकीय पावले टाकतात. काँग्रेस पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये असतांना बंड पुकारले. अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांना विरोध करत त्यांनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

लोकसभेला झांबड यांच्याविरोधात काम केल्यानंतर सत्तार यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरु केले. पण सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना कडाडून विरोध केला. यावर फडणवीसांनी मार्ग काढत सत्तारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला देत युतीत भाजपकडे असलेली जागा शिवसेनेला सोडली.

सत्तारांचा गेम यशस्वी ठरला ते निवडून आले पण राज्यात युतीऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आले. यात कॅबिनेटची आशा बाळगून असलेल्या सत्तार यांना राज्यमंत्रीपद मिळाले. या सरकारचा अडीच वर्षाचा काळ पुर्ण होत नाही तोच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेच्या बंडात सत्तारांनी उडी घेतली.

शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि सत्तारांना कॅबिनेटपदी बढती मिळाली. कृषी सारखे महत्वाचे खातेही मिळाले. आता ते अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री म्हणून महायुतीचा भाग आहे. नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात महायुतीचे पानीपत झाले. आठ पैकी संभाजीनगर वगळता सातही मतदारसंघात शिवसेना-भाजपच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला.

मनोज जरांगे फॅक्टर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिक प्रभावशाली ठरेल याची चाहूल सत्तार यांना लागली आहे. कल्याण काळे यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने शिवसेनेसोबत असलेला जुना प्रासंगिक करार मोडू पाहत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुर्वी अब्दुल सत्तार दुसऱ्या पक्षात दिसले तर नवल वाटू नये, अशीच काहीसी परिस्थिती निर्माण झाली आहे. रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील पराभवानंतर सत्तार यांच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर देतांनाच त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीच संकेतही दिले आहेत.

Eknath Shinde, Abdul Sattar
Pune Bjp : धंगेकर पडले, धीरज घाटे, हेमंत रासने आमदारकीच्या उमेदवारीसाठी लढले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com