Imtiaz Jaleel : निकालाआधी फटाके फोडले, इम्तियाज जलील यांचा पतंग हवेत की कटणार?

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024 : इम्तियाज यांच्या विजयाने कित्येक वर्षानंतर या मतदारंसघात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळाले. या विजयाची चर्चा केवळ राज्यात नाही, तर देशभरात झाली.
Imtiaz Jaleel, Asaduddin Owaisi
Imtiaz Jaleel, Asaduddin Owaisi Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज जलील लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशिब आजमावत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांनी निवडून आलेले इम्तियाज जलील खऱ्या अर्थाने 'तकदीरवाला' ठरले होते.

ज्या औरंगाबाद मतदारसंघात एमआयएमची ताकद नाही, ग्रामीण भागात आमचे नेटवर्क नाही असे म्हणत लढण्यास नकार देणाऱ्या इम्तियाज यांनी समर्थकांच्या आग्रहानंतर ओवेसींना लढण्यासाठी गळ घातली होती. मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या औरंगाबादेतून लढायचे नाही तर कुठून लढायचे? असा सवाल तेव्हा एमआयएमच्या (AIMM) स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी केला होता.

अगदी कमी वेळात एमआयएमने शहर आणि ग्रामीण भागात प्रचार केला, हिंदूबहुल मतदारसंघात विजय मिळवणे अशक्य असल्याची जाणीव या पक्षाला होती. पण अपक्ष हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी इम्तियाज यांच्यासाठी जॅकपाॅट ठरली. इम्तियाज यांच्या विजयाने कित्येक वर्षानंतर या मतदारंसघात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळाले. या विजयाची चर्चा केवळ राज्यात नाही, तर देशभरात झाली.

विरोधकांनी इम्तियाज यांची 'अ‍ॅक्सिडेंटल MP' अशी हेटाळणी केली. पण पाच वर्षांत इम्तियाज जलील यांनी दिल्लीत सभागृह आणि मतदारसंघात जिल्हा दणाणून सोडला. पण 2024 मध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलले, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षात फूट पडली, गेल्यावेळी सोबत असलेली वंचित बहुजन आघाडी वेगळी झाली.

Imtiaz Jaleel, Asaduddin Owaisi
Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, दिले 'हे'आदेश

इम्तियाज यांच्याविरोधात मुस्लिम उमेदवार देत प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील (Imtiiaz Jaleel) यांच्यावर असलेला राग व्यक्त केला. वंचितमुळे दुरावलेल्या मतांची कसर इम्तियाज यांनी मुस्लिम मतांचा टक्का वाढवत भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्याने भागणार नाही, याची जाणीव असूनही मतदानानंतर इम्तियाज समर्थकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी करत फटाके फोडले.

निकालाआधी केलेला विजयाचा जल्लोष निकालानंतर करण्याची संधी मतदार त्यांना देतात का? हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. इम्तियाज जलील यांच्यासाठी सलग दुसरा विजय सोपा नसला तरी तो अशक्य मात्र नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा इम्तियाज यांच्या पुन्हा कामाला येतो का? महायुती- महाविकास आघाडीतील मत विभाजन इम्तियाज यांच्या पंतगाला पुन्हा हवा देते की तो काटते? यावर सगळं अवलंबून असणार आहे.

Imtiaz Jaleel, Asaduddin Owaisi
Devendra Fadnavis Vs Nana Patole : सबसे बडा खिलाडी कौन ? फडणवीस की नानाभाऊ…

इम्तियाज जलील लोकसभेला पराभूत झाले तर त्यांचा बी प्लान काय असेल? याबद्दल तर्क लढवले जात आहे. निकालाआधी इम्तियाज यांनी दोनशे टक्के विजयाचा दावा केला आहे. तो कितपत खरा ठरतो? इम्तियाज जलील विधानसभा मध्य मतदारसंघातून पुन्हा नशिब आजमावतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे उद्याच्या निकालानंतर मिळणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Imtiaz Jaleel, Asaduddin Owaisi
Nagesh Ashtikar: ठाकरेंच्या शिलेदाराला पराभवाची भीती; मतमोजणी केंद्राची केली तीन वेळा पाहणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com