Chhatrapati Sambhajinagar Loksabha News : शाहांनी सस्पेंस कायम ठेवला, पण कराडांनी उमेदवारीच्या थाटात विरोधकांवर हल्ला चढवला...

Bhagwat Karad : येत्या काही काळातच लोकसभेची पुढची यादी जाहीर होणार आहे, पण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गेल्या दोन वर्षांपासून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
Amit Shah, Bhagwat Karad
Amit Shah, Bhagwat Karad Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : दोन दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संभाजीनगरातील सभेत भाजपचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण भाजपचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाह यांनी जागा भाजपच लढवणार हे स्पष्ट करतानाच उमेदवारीबद्दलचा सस्पेंस मात्र कायम ठेवला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गेल्या दोन वर्षांपासून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

अमित शाह यांच्या सभेच्या नियोजनातही तेच पुढे होते. त्यामुळे मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच्या व्यासपीठावर त्यांचा वावर हा भाजपचा उमेदवार असाच होता. आपल्या छोटेखानी भाषणातही त्यांनी निवडणुकीतील प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, विद्यमान एमआयएमचे खासदार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इम्तियाज जलील यांनी पाच वर्षांत केलेले, तर त्याआधी सलग चार टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंनी काय काम केले? त्यांनी एकतरी काम सांगावे, असे आव्हान देत दंड थोटपले. Chhatrapati Sambhajinagar Loksabha election 2024 Amit Shah maintain suspense

जणू भाजपची उमेदवारी त्यांना जाहीर झाली, अशा थाटात कराड यांनी विरोधकांना अंगावर घेतले. हे करत असतानाच आपल्या साडेतीन वर्षांच्या काळात शहरासाठी आणलेल्या योजना, पाइप गॅस, हवमानाचा अंदाज घेणारे उपकरण, बँकांचे जाळे, मुद्रा लोन यासह केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची आकडेवारीसहीत माहिती दिली. भाजपकडून संभाव्य उमेदवारांच्या यादीत कराड यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah, Bhagwat Karad
Shivsena UBT News : परिवारवादावर धूळफेक करणाऱ्या शाहांनी आधी व्यासपीठावर पाहायला हवे होते; ठाकरे गटाचा पलटवार...

भाजपच्या ( BJP ) अंतर्गत सर्व्हेची चर्चा करून काही पक्षांतर्गत विरोध त्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशा चर्चा करत असले तरी भाजपकडे सध्या तरी आर्थिक आणि संपूर्ण जिल्ह्यात संपर्क असलेला दुसरा उमेदवार नसल्याचे बोलले जाते. राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या नावाची चर्चा आहे, पण ते लोकसभा ( Loksabha ) लढवण्यास इच्छुक नाहीत. पण पक्षाने उमेदवारी लादली तर त्याचा नाइलाज होईल.

याशिवाय काही नावे फक्त चर्चेसाठी घेतली जात आहेत, पण त्याला पक्षश्रेष्ठीकडूनही महत्त्व दिले जात नसल्याचे दिसते. शाह ( Amit Shah) यांनी सभेपूर्वी आढावा घेतला, त्या कराड यांचेच नाव सध्या तरी प्रामुख्याने पुढे असल्याचे दिसते. येत्या दोन-तीन दिवसांत भाजपच्या ( BJP ) देशातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होऊ शकते. Chhatrapati Sambhajinagar Loksabha election 2024 News

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यात महाराष्ट्राचाही समावेश असेल, तेव्हा मराठवाड्यातील ( Marathwada) काही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचीही घोषणा होऊ शकते. शिवसेनेशी असलेल्या 35 वर्षांच्या युतीनंतर पहिल्यांदा भाजप स्वतंत्रपणे संभाजीनगरमधून ( Chhatrapati Sambhajinagar) लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. अशावेळी दिल्ली आणि राज्यातील नेते कोणतीही जोखीम पत्करणार नाही, असे बोलले जाते.Chhatrapati Sambhajinagar Loksabha election

Edited By : Rashmi Mane

R

Amit Shah, Bhagwat Karad
Imtiaz Jaleel Vs Amit Shah : 'मजलीस को उखाड फेंकोगे ना...' ; अमित शाहांचे विधान जलील यांच्या जिव्हारी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com