Sandipan Bhumare : 'या' त्रिमूर्तींनी दिलं भुमरेमामांना लीड; पण मंत्र्यांच्या मतदारसंघात पिछेहाट

Sandipan Bhumare Vs imtiyaz jaleel : भुमरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांच्यावर तब्बल 1 लाख 35000 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला.
Sandipan Bhumare
Sandipan Bhumaresarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 5 June : मराठवाड्यातील एकमेव लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचे संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली. या विजयाने 2019 मध्ये झालेल्या पराभवाचा डागही पुसला गेला.

भुमरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार 'एमआयएम'चे इम्तियाज जलील ( imtiyaz jaleel ) यांच्यावर तब्बल 1 लाख 35000 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. महायुतीसाठी संभाजीनगरमधील एकमेव विजय पत राखणारा ठरला.

भुमरे यांच्या विजयात महायुतीच्या घटक पक्षातील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचीही मदत झाली. पण भुमरेंच्या मताधिक्यात मोठा वाटा राहिला तो शहरातील पश्चिमचे विद्यमान आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ), ग्रामीणमध्ये वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब ( Prashant Bamb ) यांचा. या तीनही मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांना मोठे मताधिक्य मिळाले.

शिरसाट यांच्या पश्चिममध्ये 95 हजार 586, प्रशांत बंब यांच्या गंगापूर मतदारसंघात 94 हजार 419 तर बोरनारेंच्या वैजापूरमध्ये 93 हजार 231 एवढी मते भुमरे यांच्या पारड्यात पडली. या मतांमुळे महायुतीचे मताधिक्य वाढण्यास मदत झाली. दुसरीकडे शहरातील शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मध्य व भाजपचे पूर्वचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघात मात्र भुमरे यांची पिछेहाट झाल्याचे दिसून आले.

Sandipan Bhumare
Auranbagad Lok Sabha Constituency : भुमरे एकटेच लढले अन् जिंकले; मराठवाड्यात महायुतीची पत राखली !

इथे 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतली होती. या दोन्ही मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय होती. ती एकगठ्ठा इम्तियाज यांच्या पारड्यात गेल्याने इथे संदीपान भुमरेंना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे एकमेव निष्ठावान असलेल्या कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मतदारसंघातून देखील महायुतीचे भुमरे यांना मताधिक्य मिळाल्याचे समोर आले आहे.

इथेही खैरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कन्नडमध्ये भुमरे यांना 68 हजार 230 तर खैरे यांना 42 हजार 338 एवढी मते मिळाली. म्हणजे राजपूत यांच्या मतदारसंघातही भुमरेंना महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा 25 हजार 892 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे भुमरे यांच्या या ऐतिहासिक विजयात शिरसाट, बंब, बोरनारे यांचा मोठा हातभार लागला.

सावे आणि जयस्वाल यांच्या मतदारंसघातून भुमरे पिछाडीवर गेल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या दोघांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. या उलट बंब, बोरनारे, शिरसाट यांची आपापल्या मतदारसंघावर मजबूत पकड असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com