ZP Election Results: एका मतानं पलटवली बाजी! शिंदेंच्या तगड्या उमेदवाराला अपक्ष उमेदवाराने दाखवले आस्मान!

Maharashtra ZP Election Results:'माझ्या एका मताने काय होणार?' असे म्हणत लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मतदारांसाठी मोठा संदेश असल्याचे मानले जात आहे.
Maharashtra Election Commission
Maharashtra Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar ZP Results 2026: लोकशाहीत एका मतालाही काय महत्व असते, याची प्रचिती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक निकालात आली. संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हनुमंत भोंदवे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत थरारक विजय मिळवला.

एक मताने निवडून आल्यानंतर गरड यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.सामान्य माणूस म्हणून जनतेने मला निवडून दिले, त्यांचे मनापासून आभार,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या निकालाद्वारे 'माझ्या एका मताने काय होणार?' असे म्हणत लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मतदारांसाठी मोठा संदेश असल्याचे मानले जात आहे.

मी सामान्य व्यक्ती असतानाही वाळू माफियांच्या आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधात मी लढलो, त्यांचे मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया गरड यांनी दिली."झालेला पराभव मान्य करतो, एक मताने की होईना पराभव असतो आणि त्या एका मताची आज किंमत कळली," अशी प्रतिक्रिया हनुमंत भोंडवे यांनी दिली. वडगाव कोल्हाटी गटात लागलेला निकाल सर्वाचेच लक्ष होते.

Maharashtra Election Commission
ZP Election Results: भाजपची 25 वर्षांची सत्ता उलथवली! अजितदादांचा पठ्ठ्या ठरला विजयाचा 'शिल्पकार'...सगळ्याच जागा जिंकल्या

अमर समुद्रे विजयी

धाराशिवमधल्या ढोकी पंचायत समिती गणातून शिवसेना ठाकरे गटाचे अमर समुद्रे विजयी झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे हे फक्त एका मतानं विजयी झाले आहेत. अमर समुद्रे यांना 3187 मतं मिळाली असून त्यांनी एका मताने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. भाजपचे निहाल काझी यांनी 3186 मतं मिळाली आहेत. अवघ्या एका मताने त्यांचा पराभव झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com