Municipal Corporation: छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सत्ताधारी कोण? अकरा लाखांहून अधिक मतदारांचा कौल ठरणार निर्णायक!

Chhatrapati Sambhajinagar Election: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 29 प्रभागातून 115 उमेदवार निवडूण द्यावे लागणार आहे. त्यासाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी 11 लाख 18 हजार 283 मतदाराची असणार आहे.
Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar
Municipal Corporation Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम सोमवारी (ता.15) जाहीर झाला. गेल्या पाच वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या भावी नगरसेवकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला असला तरी महापालिकेतील सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार? याचा फैसला 11 लाख 18 हजार 263 मतदार 15 जानेवारी 2026 रोजी करणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी (Mahapalika Election) प्रशासनाने सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात 165 मते वाढली असून, नव्या याद्यांनुसार 11 लाख 18 हजार 263 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही प्रभागातील मते कमी करण्यात आली आहेत तर काही प्रभागातील मते वाढली आहेत. सर्वाधिक 50 हजार 103 प्रभाग पाचमध्ये आहेत तर सर्वाधिक कमी 32 हजार 522 मतदार प्रभाग 26 मध्ये आहेत.

रावरसपूरा ग्रामपंचायतीमधून चुकीने आलेले 814 मतदार वगळण्यात आले आहे तर शांतीपूरा भागातील 940 मतदार पुन्हा यादीत घेण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता (Code Of Conduct) लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत घेत निवडणूकीबद्दलची माहिती दिली.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 29 प्रभागातून 115 उमेदवार निवडूण द्यावे लागणार आहे. त्यासाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी 11 लाख 18 हजार 283 मतदाराची असेल. प्रारुप मतदार यादीमधून रावरसपूरा भागातील 814 मतदार वगळण्यात आले असून छावणी प्रभागातील शांतीपूरा भागातील 940 मतदारांची वाढ झाली आहे. प्रभाग-16 मधील 40 हजार 649 मतदारांपैकी 6657 मतदार कमी होऊन 35 हजार 593 मतदाराचा झाला आहे.

Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar
Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांना मतदारांनी चक्क घोड्यावर बसवलं!

प्रभाग-3 हा 40 हजार 649 मतदारांपैकी 5 हजार 47 मतदार कमी होऊन 35 हजार 602 मतदारांचा झाला. प्रभाग 15 हा 40 हजार 346 मतदारांपैकी 4 हजार 931 मतदार कमी होऊन 35 हजार 415 मतदाराचा झाला असल्याची माहिती श्रीकांत यांनी दिली आहे.

विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी ज्या प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतात, तसे अधिकारी महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे माझ्याच नियंत्रणाखाली निवडणुक होणार असल्याचे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com