Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांना मतदारांनी चक्क घोड्यावर बसवलं!

Abdul Sattar News: मंत्रीपद गेलं, निवडणुकीत मतदारांनी जोर का झटका दिला ही धोक्याची घंटा ओळखत सत्तार यांनी कमबॅक केलं.
Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांना मतदारांनी चक्क घोड्यावर बसवलं!
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार हे राजकारणातील एक अजब रसायन आहे. विरोधकांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावला होता, पण ते थोडक्यात बचावले. काठावर निवडून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सत्तार यांनी गेल्या वर्षभरापासून आपले संपूर्ण लक्ष मतदारसंघावर केंद्रित केले. मंत्रीपद गेले, निवडणुकीत मतदारांनी जोर का झटका दिला ही धोक्याची घंटा ओळखत सत्तार यांनी कमबॅक केले.

Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांना मतदारांनी चक्क घोड्यावर बसवलं!
Ashok Chavan News: हेच खरं विकासाचं चित्र! अशोक चव्हाणांचा मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव

मतदारसंघातील गावागावात विकास कामासाठी निधी, आधी झालेल्या कामांचे लोकार्पण आणि मतदारांशी थेट संपर्कावर सध्या सत्तार यांचा भर आहे. नगरपालिका निवडणुकीत मुलाला नगराध्यक्ष करण्यासोबतच सत्ता राखण्यासाठी अब्दुल सत्तारांनी पूर्ण ताकद झोकून दिली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनातून परतल्यानंतर सत्तार सध्या मतदारसंघातील गावागावात फिरत आहेत. अशाच एका तलवाडा येथे 37 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे लोकार्पण सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला म्हणून गावकऱ्यांनी चक्क सत्तारांना घोड्यावर बसण्याचा आग्रह धरला.

Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांना मतदारांनी चक्क घोड्यावर बसवलं!
Shashi Tharoor: 'मनरेगा'च्या वादावर शशी थरुरांनी व्यक्त केली सडेतोड भूमिका; म्हणाले, राम राज्याची संकल्पना...

सध्या मतदारांना नाराज करणे परवडणारे नाही, हे लक्षात आल्यामुळे सत्तार यांनीही फारसे आढेवेढे न घेता घोड्यावर बसत गावकऱ्यांचा मान राखला. नगरपालिका निवडणुक प्रचारात लक्ष्मी दर्शन घ्या, जे पैसे देतील त्यांचे पैसे काजू, किशमिश समजून खा, पण बटन धनुष्यबाणाचेच दाबा, असे आवाहन करत सत्तार यांनी वाद ओढावून घेतला होता. परंतु वाद आणि सत्तार हे समीकरण नवे नाही. सत्तार परिणामाची पर्वा न करता बेधडक विधाने करतात. ती अनेकदा त्यांच्या अंगलटही आली आहेत.

Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांना मतदारांनी चक्क घोड्यावर बसवलं!
Nagpur News: नागपूर महापालिकेची निवडणूक घोषित पण आरक्षणामुळं पुन्हा...; नेमकं काय घोळ झालाय?

विशेषतः मंत्री असताना त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळं त्यांना काही काळ माध्यमांपासून दूर राहण्याचा सल्लाही पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिला होता. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांच्या याच गुणांमुळं त्यांना आपल्या मंत्रीमंडळापासून दूर ठेवले. आता जोपर्यंत आपण एकनाथ शिंदे यांचे पुन्हा आवडते होत नाहीत, तोपर्यंत आपली मंत्रीमंडळात घरवापसी शक्य नाही, याची जाणीव सत्तार यांना झाली आहे. त्यामुळेच पक्षापासून अंतर राखत गड्या आपला मतदारसंघच बरा, अशी भूमिका सध्या सत्तारांनी स्वीकरली आहे.

Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांना मतदारांनी चक्क घोड्यावर बसवलं!
Voter App : मतदान केंद्रावर नाव शोधण्यात वेळ वाया घालवू नका! निवडणुका आयोगानं आणलंय 'हे' खास अॅप

यापुर्वी मतदारसंघ, जिल्हा, मराठवाडाच नाही तर राज्यातील प्रमुख नेता म्हणून अब्दुल सत्तार ओळखले जायचे. सातत्याने माध्यमांच्या समोर जाणारे, कोणाचीही टर उडवणारे सत्तार सध्या मात्र माध्यामांपासून अंतर राखून असतात. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा कॅमेऱ्यांनी त्यांच्यावर फोकस केला होता, पण नेहमीप्रमाणे सत्तार काही खुलले नाही. मतदारसंघातील हा घोड्यावर बसलेला सत्तार यांचा नवा अवतार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com