Sambhajinagar Mahapalika : अंबादास दानवेंचा डाव परफेक्ट बसला! टीका झालेल्या रशीद 'मामूं'नीच राखली उद्धव ठाकरेंची इभ्रत

Rashid Mamu Result : टीकेचा सामना करून रशीद मामूंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय मिळवला, मुस्लिम उमेदवारीवरील आरोप फोल ठरवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची इभ्रत राखली आणि स्थानिक प्रश्न, संपर्क, संघटनात्मक ताकदीला मतदारांनी प्राधान्य दिले स्पष्ट.
Shiv Sena (UBT) leader Rashid “Mamu” Khan celebrates his decisive victory in Chhatrapati Sambhajinagar municipal elections, marking a key political moment for Uddhav Thackeray’s party.
Shiv Sena (UBT) leader Rashid “Mamu” Khan celebrates his decisive victory in Chhatrapati Sambhajinagar municipal elections, marking a key political moment for Uddhav Thackeray’s party.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ 'मामू' यांना प्रवेश अन् उमेदवारी दिल्यानंतर राज्यभरात गजहब उडाला होता. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता मामू पक्ष झाला आहे, अशी टीकेची झोड अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते शिंदेंच्या शिवसेनेच्या गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी उठवली होती. पण याच रशीद मामू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय मिळवत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची इभ्रत राखली. पक्षाने ज्या सहा जागा जिंकल्या त्यामध्ये मामूंचांही समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत जातीय समीकरण जुळवण्यासाठी अंबादास दानवे यांनी माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना थेट मातेश्रीवर घेऊन जात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश दिला होता. जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे नेते चंद्रकांत खैरे या निर्णयामुळे कमालीचे नाराज झाले होते. पक्षात घेतले पण त्यांना उमेदवारी मिळू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पण तिथेही अंबादास दानवेंची सरशी झाली आणि मामूंना प्रभाग चारमधून उमेदवारी मिळाली. आता त्याच मामूंनी विजय मिळवत पक्षाचे नाक राखल्याची चर्चा होऊ लागली आहे.

प्रभाग 4 (ब) मधील निवडणूक निकालाने राजकीय आरोप–प्रत्यारोपांनाही छेद दिला असून रशिद खान (मामू) हमीद खान यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. या प्रभागात निवडणूक प्रचारा दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुस्लिम उमेदवारीचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांचा पक्ष मामू पक्ष झाल्याची टीका केली होती. मात्र, मतदारांनी या आरोपांना फारसा प्रतिसाद दिला नाही, हे निकालातून स्पष्ट झाले आहे.

Shiv Sena (UBT) leader Rashid “Mamu” Khan celebrates his decisive victory in Chhatrapati Sambhajinagar municipal elections, marking a key political moment for Uddhav Thackeray’s party.
Parbhani Election: परभणीत भाजप-शिवसेनेला धक्का! ठाकरेंची सेना, काँग्रेस महाविकास आघाडी बाजी मारण्याची शक्यता

शिवसेनेचे उमेदवार अमोल निकम यांना 6 हजार 624 मते मिळाली. तर एमआयएमचे आमेर अन्वर खान यांना 4 हजार 69 मते, भाजपच्या तन्वी मुंडले यांना 3 हजार 457 मते मिळाली. निवडणूक प्रचारात मुस्लिम उमेदवारीवरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक प्रश्न, उमेदवाराची ओळख, संपर्क आणि संघटनात्मक ताकद यालाच मतदारांनी प्राधान्य दिल्याचे या निकालातून दिसून आले. रशिद मामू यांनी सर्व समाजघटकांमध्ये संपर्क ठेवत प्रचार केल्याचा फायदा त्यांना झाल्याचे बोलले जाते.

Shiv Sena (UBT) leader Rashid “Mamu” Khan celebrates his decisive victory in Chhatrapati Sambhajinagar municipal elections, marking a key political moment for Uddhav Thackeray’s party.
Chhatrapati Sambhjinagar : मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीपूर्वीच मोठा राडा; पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा नेमकं काय घडलं?

मताधिक्य निर्णायक

चार प्रमुख उमेदवारांमध्ये लढत असली तरी रशिद मामू यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. शेवटच्या फेऱ्यांमध्ये ही आघाडी अधिक भक्कम झाली. त्यामुळे मुस्लिम उमेदवारीवरून करण्यात आलेले आरोप मतपेटीपर्यंत पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले. महापालिका निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव झाला, असला तरी रशिद मामूंना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचा अंबादास दानवे यांचा निर्णय योग्य ठरला एवढेच काय ते समाधान.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com