Municipal Corporation News : निवडणूक आयोगाचा नवा नियम; नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांना बसला ऐनवेळी 'शॉक'

Chhatrapati Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत उमेदवारांना स्वच्छतागृह असल्याचे शपथपत्र देणे बंधनकारक करण्यात आले असून, निवडणूक आयोगाच्या या नियमामुळे इच्छुकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
Election officials verifying nomination documents as candidates submit affidavits confirming toilet availability, a mandatory requirement for Chhatrapati Sambhajinagar municipal elections.
Election officials verifying nomination documents as candidates submit affidavits confirming toilet availability, a mandatory requirement for Chhatrapati Sambhajinagar municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : महापालिका निवडणुक लढवू इच्छिणाऱ्यांना यावेळी चक्क त्यांच्याकडे स्वच्छतागृह असल्याचे शपथपत्र द्यावे लागणार आहे. निवडणुक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांकडून असे अ‍ॅफिडेव्हीट मागितले आहे. या नव्या नियमाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक असून, इच्छुकांची अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे.

यावेळी उमेदवारी अर्जासोबत स्वच्छतागृह असल्याचे शपथपत्र द्यावे लागत असल्याने अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे. शहरात राहून घरी स्वच्छतागृह नसलेला उमेदवार कोण असू शकतो? अशा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून (ता. 23) अर्जांचे वाटप व ते दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने 9 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत अर्ज वाटप व भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दोन दिवसांत 3170 उमेदवारी अर्ज विक्री झाली आहे. गुरुवारी (ता. 25) नाताळची सुट्टी असल्याने अर्ज विक्री व भरण्याची प्रक्रिया बंद होती. अनेकजण सध्या एकापेक्षा अधिक अर्ज खरेदी करत असून, अर्ज चुकू नये म्हणून पहिले डमी व नंतर अंतिम अर्ज भरला जातो. निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांमध्ये अनेक जण माजी नगरसेवक आहेत.

Election officials verifying nomination documents as candidates submit affidavits confirming toilet availability, a mandatory requirement for Chhatrapati Sambhajinagar municipal elections.
ShivSena Vs BJP : भाजपला थोपवण्यासाठी सिंधुदुर्गचा पॅटर्न मराठवाड्यात राबवणार? युतीचे 12 वाजताच शिवसेनेकडून तिसरा प्लॅन अॅक्टिव्ह

मात्र स्वच्छतागृह असल्याचे शपथपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारने 2016 चा अधिनियम क्रमांक 19 अन्वये नागरी संस्थांचे सदस्य होण्याकरिता स्वच्छतागृह वापरण्याबाबतची सुधारणा केली आहे. त्यानुसार महापालिकेने पदनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांचे किंवा स्वयंप्रमाणपत्र इच्छुकांनी भरणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार इच्छुकांना अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. महापालिकेने प्रभाग कार्यालयांना स्वच्छतागृहाबाबतचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार दिले आहेत.

Election officials verifying nomination documents as candidates submit affidavits confirming toilet availability, a mandatory requirement for Chhatrapati Sambhajinagar municipal elections.
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंनी चक्क 39 एकर जमीन फुकट वाटली! कुठे जमीन बळकावणारा अन् कुठे..." भाजप पदाधिकाऱ्याचा अब्दुल सत्तारांवर निशाणा!

रिकाम्या जागा भरा..

अर्जामध्ये विचारण्यात आलेली प्रत्येक माहिती भरणे बंधनकारक आहे. एकाही ठिकाणी होय किंवा नाही असे लिहिलेले नसेल तर इच्छुकांचा अर्ज बाद होऊ शकतो, त्यानुसार अर्ज भरण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून त्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com