Ambadas Danve News: महाराष्ट्र उलट चिडून मतदान करेल..जय भवानी! जय शिवराय!

Ambadas Danve On Election Commission: भाजपच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राची अस्मिता दाबण्याचा प्रकार आहे. सहन करणार नाही, महाराष्ट्र उलट चिडून मतदान करेल.. जय भवानी! जय शिवराय!! अशा शब्दांत दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईवर टीका केली.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar: शिवसेना ठाकरे गटाने प्रचारासाठी तयार केलेल्या मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी या शब्दांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने ते वगळण्यासंदर्भात नोटीस दिली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी, शाह यांच्या भाषणातील उल्लेखाचे दाखले देत निवडणूक आयोगाने आधी त्यांच्यावर कारवाई करावी, अशा शब्दांत टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीसवर संताप व्यक्त केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve On Election Commission) यांनी निवडणूक आयोगाच्या अशा एकतर्फी कारवाईने उलट महाराष्ट्र चिडून मतदान करेल, अशा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. निवडणूक आयोगाला आमचे प्रचार गीत ऐकून जळजळ उठली आहे.

त्या गाण्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत भवानी मातेचे जयघोष यांना चालत नाही! महाराष्ट्रात आई भवानीचे नाही तर मग कोणाच्या नावाचा जयघोष करायचा? या असल्या द्वेषाने भरलेल्या खलीत्याला आम्ही भीक घालत नाही. हा भाजपच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राची अस्मिता दाबण्याचा प्रकार आहे. सहन करणार नाही, महाराष्ट्र उलट चिडून मतदान करेल.. जय भवानी! जय शिवराय!! अशा शब्दांत दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईवर टीका केली.

Ambadas Danve News
Solapur Politics: सोलापुरात एमआयएमचा काँग्रेसने नव्हे, तर भाजपने घेतलाय धसका

शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन मशाल प्रचार गीतामधून 'हिंदू धर्म' आणि 'जय भवानी' हे शब्द काढून टाकावे, अशी नोटीस निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल माध्यमांना दिली होती. यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काय कारवाई केली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला होता.

मी 'हिंदू' धर्म सोडल्याची टीका करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे. त्यांनी सांगावे 'हिंदू' धर्म हा शब्द काढायला लावणं योग्य आहे का? आम्ही कुठेही 'हिंदू' धर्माच्या आधारावर मत मागितलं नाही. आम्ही 'हिंदू' धर्म सोडलं हे आवई उठवणाऱ्या आणि चाकर असलेल्या निवडणूक आयोगानं याचं उत्तर दिलं पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिसीवर भाष्य करणारे ट्विट केले.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com