Sanjay Shirsat: धक्कादायक: आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक

Sanjay shirsat car was pelted with stones Near Chhatrapati Sambhajinagar: आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. दगडफेक झाली तेव्हा गाडीत शिरसाट याची पत्नी,कन्या आणि मुलगा होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे रविवारी रात्री ही घटना घडली. संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात हा प्रकार घडला.

आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat)यांच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. दगडफेक झाली तेव्हा गाडीत शिरसाट याची पत्नी,कन्या आणि मुलगा होता, अशी प्राथमिक माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिली.

Sanjay Shirsat
Pune Hit And Run: ‘हिट ॲण्ड रन’ घटनेने पुणे पुन्हा हादरले; दोन पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले, एकाचा मृत्यू

रस्त्यावर भांडण सुरू असल्याने शिरसाट कुटुंबीयांनी गाडी थांबवली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकल्याचे समजते. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी रवाना झाले.

आमदार शिरसाट यांच्या गाडीवर दगड कुणी भिरकावला, याचा तपास पोलिस करीत आहेत. या घटनेनं संभाजीनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी देखील त्याठिकाणी गर्दी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com