Chhatrapati Sambhajinagar News, 26 Sep : "गाव छोटी-मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक म्हणतात, त्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे झाले आहे. शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक तसंच राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक", असं झालं आहे.
असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी (Shivsena NCP) काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीवर टोलेबाजी केली आहे. आगामी विधानसभेसाठी राज्यात संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी निर्माण केली आहे.
ही आघाडी राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात करण्यात आली आहे. याच तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्ती मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजत करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फुटीवर भाष्य केलं.
तसंच मालवणमधील राजकोट किल्ल्यावरूल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर भाष्य करत सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला. संभाजीराजे म्हणाले, "भाजप (BJP) विद्वान असल्याच्या नादात पक्षांचे विभाजन करत होता, काँग्रेसच काही वेगळंच सुरू होतं. राष्ट्रवादी कुणाची, शिवसेना कुणाची सगळा गोंधळ होता.
गाव छोटी मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक म्हणतात. तसं राष्ट्रवादी-शिवसेनेचं (Shivsena) झाले आहे. शिवसेना खुर्द आणि बुद्रुक तसंच राष्ट्रवादी खुर्द आणि ब्रूद्रुक झालंय. हे लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले नाहीत, तर स्वतःच्या स्वार्थासाठी ते असे झाले आहेत. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केला आहे."
यावेळी त्यांनी गड किल्ल्यांना 75 वर्षात किती पैसे दिले सांगा? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, गड किल्ल्यांना 75 वर्षात किती पैसे दिले सांगा? 350 गडकोट किल्ल्यांचे काय केले? नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेता, मी अध्यक्ष झालो म्हणून रायगडावर काहीतरी करू शकलो. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला.
त्यावेळी मी मोदीजींना (Narendra Modi) पत्र लिहलं की, घाई गडबडीत पुतळा उभारला आहे, तो पुतळा बदला असं मी सांगितलं. डिसेंबरमध्ये मी हे पत्र लिहलं होतं पण त्यावर कुणीही काही बोललं नाही, अशी आठवण यावेळी संभाजीराजेंनी करून दिली.
तर यावेळी राजू शेट्टी म्हणाले, "आम्हाला भाजप बी टीम म्हणून हिणवले जाते, पण आम्ही जातीधर्माच्या नावाने एकत्र आलो नाही, तर धर्मनिरपेक्षता घेऊन आम्ही मैदानात आलो आहोत. महाराष्ट्र घडवण्यासाठी हे परिवर्तन गरजेचे आहे म्हणून आम्ही मैदानात उतरलोय. महाराष्ट्राचा सातबारा आपल्या बापाचा आहे असं सगळं सुरु आहे, मात्र हा सातबारा कष्टकरी जनतेचा आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.