Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यात सुनावण्यात आलेल्या 15 दिवसांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांची तुरुंगवारी तात्पुरती टळली आहे.
मेधा किरीट सोमय्या यांच्यावर राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याविरोधात सोमय्या यांनी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. या खटल्यात न्यायालयाने गुरूवारी राऊतांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच 25 हजारांचा दंडही ठोठावला. त्यानंतर राऊतांनी वरिष्ठ कोर्टात दाद मागण्यासाठी मुदत देण्याची विनंती केली होती.
कोर्टाने संजय राऊतांना वरिष्ठ कोर्टात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. तसेच 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनही मंजूर करण्यात आला आहे. राऊतांसाठी हा मोठा दिलासा आहे. राऊतांना आता दिलेल्या मुदतीत शिक्षेच्या निकालाविरोधात दाद मागावी लागेल.
सुरूवातीला आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी शिक्षा सुनावल्यानंतर दिली आहे. सगळं ऑन रेकॉर्ड आहे. मी केवळ काही प्रश्न उपस्थित केले होते. कथित भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झालली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहित चौकशीची मागणी केली होती. मीरा-भाईंदर महापालिकेचा अहवाल होता.
मला 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलणं थांबवणार नाही. जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे, त्यावर आम्ही काही बोलायचे नाही का? आमदार, खासदार, महापालिका सगळ्यांनी तक्रारी केल्या, पण फासावर संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे.
जिथे सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला पंतप्रधान मोदी जातात, तिथे आम्हाला काय न्याय मिळणार, असे राऊत यांनी म्हटले आहे. एकीकडे न्यायालयाचा आपण आदर करत असल्याचे सांगताना त्यांनी न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाल्याचा गंभीर आरोपही केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.