Chhatrapati Sambhajinagar News : कोणी म्हणत मशाल, तर कोणी बाण ? पतंगाची धास्ती कायम..

Political News : भाजपच्या घशातून संभाजीनगरची जागा काढून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. स्वतः जिल्ह्यात दोन-तीन दिवस मुक्काम ठोकत त्यांनी शिवसेनेसह मित्रपक्षाला चार्ज केले होते.
Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Khaire, Bhumre or Imtiaz JalilSarakarnama

Chhatrapati Sambhajinagar Constituency 2024 : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी मतदान पार पडल्यानंतर आता आकडेमोड सुरू झाली आहे. महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम अशा तिरंगी झालेल्या लढतीत विजयाचे दावे तिघांकडूनही केले जात आहेत. भुमरे-खैरे- इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी मतमोजणीआधीच उमेदवारांच्या गळ्यात हार घालून जल्लोष केल्याचेही दिसून आले.

 पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी प्रत्यक्षात महायुतीच्या जिल्ह्यातील ज्या आमदारांवर सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती त्या विशेषतः शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या आमदारांची धाकूधक वाढली आहे.

भाजपच्या घशातून संभाजीनगरची जागा काढून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. स्वतः जिल्ह्यात दोन-तीन दिवस मुक्काम ठोकत त्यांनी शिवसेनेसह मित्रपक्ष भाजप (Bjp) आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला चार्ज केले होते.

Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Vasant More News : निवडणूक झाली वसंत मोरे 'वंचित'मध्येच राहणार का? स्वतःच दिलं उत्तर

बुथप्रमुखांच्या बैठका घेत अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी मार्गदर्शन केले होते. या शिवाय शहरातील मध्य, पश्चिम मतदारसघाचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, ग्रामीणमध्ये वैजापूरचे प्रा. रमेश बोरनारे यांना भुमरेंसाठी ताकद लावा, असे आदेश दिले होते.

एवढेच नाही, तर लोकसभा मतदारसंघात तुमच्या विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळते हे तुम्हाला उमेदवारी देतांना पाहिले जाईल, अशी धमकी वजा इशारा दिला होता. 

63.7 टक्के एवढे मतदान झाल्यानंतर या आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील टक्केवारी नुसार आकडेमोड सुरू केली आहे. शहरातील तीनही मतदारसंघात महायुतीच्या भुमरे इतकेच महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना मते मिळाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर मुस्लिम मतांचा टक्का वाढल्याने या दोन्ही उमेदवारापेक्षा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शहरी भागात आघाडी घेतल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामीणमधील कन्नड, वैजापूर आणि गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीच्या मशालचा वरचष्मा राहिल्याचा दावा केला जातोय. ग्रामीण भागात चंद्रकांत खैरे पहिल्या तर भुमरे दुसऱ्या क्रमाकांवर चालले असे सांगितले जाते. इम्तियाज जलील यांना ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जाते.

 शहरी भागातून भुमरे-खैरे यांना सारखा प्रतिसाद मिळाल्याचे मतदानाच्या टक्केवारीतून समोर येत असल्याने शिवसेनेचे पश्चिम, मध्यचे आमदार शिरसाट, जैस्वाल यांची धाकधूक वाढली आहे. तर मध्य विधानसभा मतदारसंघात भुमरेंना किती मताधिक्य मिळते? याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष असणार आहे. ग्रामीणमध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेमध्ये चुरस पहायला मिळाली. 

माजी आमदार आणि शिवसेनेचे स्थानिक नेते भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी खैरेंसाठी जोर लावला होता. येणाऱ्या विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे वैजापूरचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.  शिंदेसेनेचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना गेल्या दीड-दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी दिला. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे शिंदेंचे लक्ष असणार आहे.

Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Praful Patel News : जिरेटोप प्रकरणावरुन अखेर पटेलांना उपरती; 'यापुढे काळजी घेऊ...'

कन्नड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांनी खैरेंना मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तर हर्षवर्धन जाधव यांनी येथे चांगली मते मिळवल्याचा अंदाज आहे. कन्नडमध्ये महायुतीचे भुमरे पिछाडीवर असल्याचे सांगितले जाते.

गंगापूर-खुलताबाद या विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनी नियोजन पद्धतीने काम करून भुमरेंसाठी मतं गोळा केल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीच्या चंद्रकांत खैरे यांच्यासाठी कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी जोर लावल्याचे दिसून आले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बंब यांच्याशी दोन हात करण्याची इच्छा बाळगून असलेल्या डोणगांवकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीची अपेक्षा आहे.

एकूणच विद्यमान आणि येणाऱ्या निवडणुकीतील इच्छूकांनी या निवडणुकीत आपापल्या परीने उमेदवारांचा प्रचार केला आहे. आता चार जूनच्या मतमोजणीनंतर या सगळ्याचे दावे किती खरे किती खोटे? हे स्पष्ट होईल.

(Edited By : Sachin Waghmare)

Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Chandrakant Khaire News: प्रचार संपताच खैरेंनी घेतले भद्रा मारोतीचे दर्शन..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com