Paithan art center license issue : कला केंद्राविरोधात जलसमाधीचा इशारा; तहसीलदारांच्या झाडाझडती धक्कादायक माहिती समोर

Chhatrapati Sambhajinagar Paithan Art Center Found Without License in Jyoti Pawar Inspection : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील देवगाव फाटा इथल्या अनधिकृत कुलस्वामिनी कला केंद्र बंद करण्यासंदर्भात सरपंचासह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
Paithan art center license issue
Paithan art center license issueSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील देवगाव फाटा इथल्या अनधिकृत कुलस्वामिनी कला केंद्र बंद करण्यासंदर्भात सरपंचासह ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यानंतर पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार यांनी शनिवारी या कला केंद्राला भेट देऊन झाडाझडती घेतली. हे केंद्र विनापरवानगी असून याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वादग्रस्त कुलस्वामिनी कला केंद्र बंद करण्यासाठी देवगावसह परिसरातील नागरिक विविध प्रकारे आंदोलने करून विरोध दर्शवित आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही. त्यामुळे देवगावचे सरपंच (Sarpanch) योगेश कोठुळे, उपसरपंच भास्कर गिते यांनी देवगाव इथल्या पाझर तलावात सामूहिकरीत्या जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

यानंतर कला केंद्र बंदसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी तहसीलदार ज्योती पवार, मंडळ अधिकारी वैशाली बैनवाड, तलाठी सुनील मोळवणे यांनी केंद्राला भेट देत कागदपत्रांची पाहणी केली, तर पाचोड पोलिस (Police) ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, बिट जमादार बाबूराव साबळेसह कर्मचाऱ्यांनी ज्या तलावात जलसमाधी आंदोलन होणार आहे, त्याची पाहणी केली.

Paithan art center license issue
Model Code of Conduct Diwali : आचारसंहिता दिवाळीपूर्वी? गट, गणाच्या आरक्षणाकडे लक्ष, प्रशासनांकडून बैठकांचे सत्र

दरम्यान, तहसीलदारांनी आंदोलकांची भेट घेत पुढील दोन दिवस सुट्या असल्याने आंदोलन करू नये, अशी विनंती केली. लवकरच अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाल्यानंतर ते निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले.

Paithan art center license issue
Vijay Waddettiwar Politics: विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, ओबीसी महामंडळांसाठी काय दिले?

अनेक गावांचा पाठिंबा

देवगाव ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनाला परिसरातील रजापूर, कडेठाण, आडूळ खुर्द, आडूळ बु., गेवराई आगलावे, ब्राह्मणगाव, हिरापूर-थापटी तांड्यासह अनेक गावांतील सरपंच, उपसरपंचांसह नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. तेदेखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे.

परवानाच नाही

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कला केंद्राच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडे कला केंद्राबाबत कोणताच परवाना आढळला नाही. पाहणीत आढळून आलेल्या बाबींसह अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com