

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर तडकाफडकी बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी बाहेरच्या जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सार्वत्रिक आणि विनंती बदल्यांची यादी गृह विभाग आणि पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुप्रिया पाटील-यादव यांच्या स्वाक्षरीने हे बदली आदेश निघाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलीस दलात 5 नवीन अधिकारी जालना, बीड, जळगाव, मुंबई या शेजारच्या जिल्ह्यातून रुजू झाले आहेत. यात शेषराव खटाणे पीटीएस जालना, अशोक मुदिराज बीड, सचिन सानप जळगाव तर साईनाथ गिते, मुंबई शहर येथून आले आहेत. राजू तडवी हे अधिकारी जालन्याच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातून रुजू झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील मंगेश जगताप यांची पुणे शहर पोलीस येथे बदली करण्यात आली आहे. तर कुंदन जाधव यांची अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्समध्ये, श्रीनिवास रोयेलावार यांची परभणीमध्ये, सोमनाथ जाधव यांची पिंपरी-चिंचवडमध्ये, राजेश मयेकर यांची मुंबई शहर येथे बदली झाली आहे.
तसेच रविकिरण दरवडे यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक आणि सुधीर धायरकर यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बदल्यामधून ती कमी करता येते का? त्यासाठी काय उपाय नवे अधिकारी योजतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.