Shivsena News : संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख जंजाळ यांच्या वादावर 'डॉक्टर श्रीकांत शिंदे' उपचार करणार! संभाजीनगरच्या विमानतळावर खलबते

Sanjay Shirsat-Rajendra Janjal Controversy : पालकमंत्री शिरसाट उपमुख्यमंत्र्यांना अवघ्या वीस मिनिटांत भेटून बाहेर येऊन थांबलेले होते. खासदार श्रीकांत शिंदे खासगी विमानाने अकराच्या सुमारास येथे पोचले.
Sanjay Shirsat-Rajendra Janjal Controversy In Chhatrapati Sambhajinagar
Sanjay Shirsat-Rajendra Janjal Controversy In Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • छत्रपती संभाजीनगरातील शिरसाट-जंजाळ वाद चिघळल्याने चिकलठाणा विमानतळावर तातडीची बैठक झाली.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर वाद निवळण्याची विशेष जबाबदारी सोपवली.

  • महायुतीत तणाव वाढल्यामुळे स्थानिक निवडणूक समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त.

योगेश पायघन

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शिवसेनेमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद उफाळून आला आहे. एकमेकांवर आरोप करत वाद थेट उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या दरबारात पोचला. काल रात्री उशीरा संभाजीनगर विमानतळावर शिरसाट, जंजाळ यांनी स्वतंत्रपणे शिंदेंची काही मिनिटांची भेट घेतली. त्या चर्चेनंतर दोघांमधील वादावर उपचार करण्याची जबाबदारी शिंदे यांनी डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे.

आता डाॅक्टर शिंदेंची मात्र शिरसाट-जंजाळ यांना लागू होती का? की मग एकनाथ शिंदे यांनाच मोठे आॅपरेशन करावे लागते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर दोघेही काल रात्री चिकलठाणा विमानतळावर पोचले. मात्र, समोरासमोर आले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांना चर्चेसाठी वेळ दिली होती. त्यानुसार दोघांत सात ते आठ मिनिटे चर्चा झाली.

महापालिका निवडणुकीसंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे काम पाहतील. बैठक घेऊन मला अहवाल देतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जंजाळ यांना सांगत वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी साडेआठपासून जंजाळ विमानतळावर आले होते, तर खासदार श्रीकांत शिंदे यांना घेण्यासाठी ऋषिकेश जैस्वाल त्यापूर्वीपासून विमानतळावर उपस्थित होते. रात्री दहाच्या सुमारास खासदार संदीपान भुमरे आले. साडेदहाच्या सुमारास एकनाथ शिंदे विमानतळावर पोचले. त्यानंतर दहा मिनिटांनी पालकमंत्री संजय शिरसाट कार्यकर्त्यांसमवेत पोचले.

Sanjay Shirsat-Rajendra Janjal Controversy In Chhatrapati Sambhajinagar
Sanjay Shirsat News : शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हाप्रमुखावर संतापले; म्हणाले कुठे जायचे तिथे जा!

दरम्यान, ऋषिकेश जैस्वाल, खासदार भुमरे, जंजाळ यांच्यासमवेत शिंदेंनी चर्चा केली. खासदार श्रीकांत शिंदे महापालिका निवडणुकीच्या तयारीत लक्ष घालतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे दोघांच्या वादावर औषध मिळाले असले तरी त्यावरून तोडगा कसा निघेल? हे पुढील काळात ठरणार आहे. दरम्यान, पालकमंत्री शिरसाट उपमुख्यमंत्र्यांना अवघ्या वीस मिनिटांत भेटून बाहेर येऊन थांबलेले होते. खासदार श्रीकांत शिंदे खासगी विमानाने अकराच्या सुमारास येथे पोचले. त्याच विमानाने एकनाथ शिंदे मुंबईकडे परतले.

Sanjay Shirsat-Rajendra Janjal Controversy In Chhatrapati Sambhajinagar
Shivsena News : शिंदेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के; फुलंब्रीत भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला!

त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांच्यासह कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांचे स्वागत केले व कारमध्ये जाऊन बसले. त्यानंतर जंजाळ हे शिंदे यांच्याजवळ आले. त्यांच्या कारमध्ये बसून जंजाळ हॉटेलकडे रवाना झाले. यावेळी पालकमंत्री शिरसाट म्हणाले, की नेते आल्यानंतर केवळ सीऑफ करण्यासाठी आलो. इथे कुठली चर्चा होत नाही, असे म्हणत अधिक बोलणे टाळले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन यांच्यासह माजी नगरसेवकांची उपस्थिती होती. जंजाळ यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5 FAQs in Marathi

1. शिरसाट-जंजाळ वाद नेमका कशामुळे उफाळला?
स्थानिक नेतृत्वातील वाद आणि निर्णय प्रक्रियेतील नाराजीमुळे संघर्ष वाढला.

2. या वादावर कोण हस्तक्षेप करत आहे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देत असून खासदार श्रीकांत शिंदे मध्यस्थी करतील.

3. चिकलठाणा विमानतळावरील बैठकीत काय चर्चा झाली?
वाद मिटवण्यासाठी पुढील रणनीती आणि पक्षातील नाराजी शांत करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

4. महायुतीवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
महापुरुषांच्या नावाने असलेल्या विभागात नाराजी वाढल्यास निवडणुकांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

5. पुढील निर्णय कधी अपेक्षित आहे?
लवकरच अंतिम तोडगा जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com