zilla parishad Reservation : छत्रपती संभाजीनगर 'मिनी मंत्रालय' आरक्षण जाहीर!अनेकांची लाॅटरी, तर काहींची विकेट!

Local Body Election Reservation Lottery : 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. 2022 मध्ये मुदत संपल्यानंतर कोरोनाच्या जागतिक संकटामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.
Chhatrapati Sambhajinagar Zilla Parisad Reservation News
Chhatrapati Sambhajinagar Zilla Parisad Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली असून, अनेकांना अपेक्षित जागा मिळाली तर काहींच्या नशिबाने साथ सोडली.

  2. महिलांसाठी, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांमध्ये या वेळेस मोठा बदल झाला आहे.

  3. आरक्षण सोडतीनंतर स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये आनंद आणि नाराजीचे सूर उमटले असून, पुढील निवडणूक गणितावर या सोडतीचा मोठा परिणाम होणार आहे.

Local Body Election News : तब्बल पाच वर्ष रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीची चातकासारखी वाट पाहणाऱ्या भावी सदस्य, अध्यक्ष, सभापतींची उत्कंठा अखेर आज संपली. जिल्हा परिषद पंचायत समिती गट, गणासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. छत्रपती संभाजीनगरच्या मिनी मंत्रालयात जाण्याची अनेकांची इच्छा आरक्षणाची लाॅटरी लागल्याने पूर्ण होणार आहे. तर काहींच्या आशेवर याच आरक्षणामुळे पाणी देखील फिरणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद (Zilla Parisad) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेला गती आलेली आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गण आणि गटासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीत अनेकांना धक्का बसला तर काही जणांना पुन्हा संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जाहीर झालेल्या आरक्षणानूसार (Reservation) जिल्हा परिषदेचे 8 गट अनुसूचित जातीसाठी, तर 3 गट अनुसूचित जमातीसाठी राखीव केले आहेत. 17 गण अनुसूचित जातीसाठी, तर 5 गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले. 63 गटांपैकी 8 गट अनुसूचित जातीसाठी, तर 3 गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले. पंचायत समितीच्या 126 गणांपैकी 17 गण अनुसूचित जातीसाठी, तर 5 गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Zilla Parisad Reservation News
Local Body Elections : ZP, महापालिकांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने आयोगाला ठणकावले, कालावधीही ठरवून दिला...

2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. 2022 मध्ये मुदत संपल्यानंतर कोरोनाच्या जागतिक संकटामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणा संदर्भातील याचिका निकाली काढत कोर्टाने येत्या 31 जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊन निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर प्रक्रियेला वेग आला. नगराध्यक्ष, नगर पंचायतीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठीची सोडत जाहीर झाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Zilla Parisad Reservation News
Chhatrapati Sambhajinagar: प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव; शिवसैनिक अस्वस्थ

जिल्हा परिषद आरक्षण सोडत

फर्दापूर- खुला (महिलाः

आमखेडा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

गोंदेगाव- अनुसूचित जमाती (महिला)

अजिंठा - खुला (महिला)

शिवना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

उंडणगाव - अनुसूचित जमाती

अंभई - नागरिकांचा मागास प्रवर्ग

घाटनांद्रा - खुला (महिला)

डोंगरगाव - खुला

भराडी- खुला

अंधारी - खुला (महिला)

केऱ्हळा- खुला (महिला)

नागद - खुला (महिला)

करंजखेडा- खुला

चिंचोली लिंबाजी- खुला

पिशोर- खुला

कुंजखेडा - खुला (महिला)

हातनूर - खुला (महिला)

जेहूर - अनुसूचित जमाती (महिला)

देवगाव रंगारी - खुला

वडोद बाजार- नागरिकांचा मागास प्रवर्ग

पाल - खुला (महिला)

गणोरी- खुला

बाजार सावंगी- खुला (महिला)

गदाना- खुला (महिला)

वेरूळ- नागरिकांचा मागास प्रवर्ग

वाकला - खुला (महिला)

बोरसर- खुला

शिवूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग

सवंदगाव - खुला (महिला)

लासुरगाव- खुला महिला

घायगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग

वांजरगाव- खुला

महालगाव- खुला

सावंगी- अनुसूचित जाती (महिला)

अंबेलोहळ- अनुसूचित जाती

रांजणगाव शेणपुंजी- अनुसूचित जाती

वाळूज बु.- अनुसूचित जाती

तुर्काबाद- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

शिल्लेगाव- खुला (महिला)

नेवरगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

जामगाव- खुला (महिला)

शेंदूरवादा- नागरिकांचा मागास प्रवर्ग

लाडसावंगी- खुला

गोलटगाव - नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

करमाड- अनुसूचित जमाती (महिला)

सावंगी - नागरिकांचा मागास प्रवर्ग

दौलताबाद - अनुसूचित जाती (महिला)

वडगाव कोलाटी उत्तर- पूर्व- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

वडगाव कोलाटी मध्य- पश्चिम- खुला

पंढरपूर - अनुसूचित जाती (महिला)

आडगाव बु.- खुला

पिंपरी बु. - खुला (महिला)

चितेगाव- खुला

बिडकीन- खुला

आडुळ बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

पाचोड बु.- खुला

दावरवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

ढोरकीन- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

पिंपळवाडी पिं.- अनुसूचित जाती

विहामांडवा - खुला

नवगाव- खुला

FAQs

1. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सोडत कधी जाहीर झाली?
ही सोडत 2025 मध्ये जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व आरक्षणाचे निकाल अधिकृतपणे प्रसिद्ध झाले आहेत.

2. आरक्षण सोडतीचा उद्देश काय आहे?
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील जागांचे सामाजिक आरक्षण ठरवण्यासाठी ही सोडत घेण्यात येते.

3. या वेळी कोणत्या वर्गांना जास्त आरक्षण मिळाले?
या वेळी महिलांना आणि इतर मागासवर्गीयांना (OBC) काही नवीन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

4. सोडतीनंतर कोणत्या नेत्यांना धक्का बसला?
काही विद्यमान सदस्य आणि माजी सदस्यांच्या जागा आरक्षित झाल्याने त्यांना स्पर्धेबाहेर रहावे लागणार आहे.

5. पुढे काय घडू शकते?
सोडतीनंतर तक्रारी आणि पुनर्विचाराच्या मागण्या होण्याची शक्यता असून, निवडणुकीच्या समीकरणात मोठे बदल दिसतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com