BJP Member Registration : भाजप सदस्य नोंदणीसाठी कॉर्पोरेट कॉन्ट्रॅक्टर! भाजपकडून करण्यात आला खुलासा

Minister Mangal Prabhat Lodha Pune BJP member registration : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटन बांधणीला सुरुवात केली आहे.
 Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातून दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीच टार्गेट भाजपकडून ठरवण्यात आला आहे.

याची जबाबदारी भाजपच्या विविध नेत्यांना देण्यात आली आहे. मात्र या नेत्यांकडून भाजप सदस्य नोंदणीसाठी कॉन्ट्रॅक्टर देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याला भाजपकडून आता उत्तर देण्यात आले आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत खुलासा केला आहे.

भाजपकडून (BJP) राज्यात सुरू करण्यात आलेल्या सदस्यता नोंदणी अभियानात 1 कोटी सदस्य नोंदवून भाजपने नवा विक्रम केला आहे.आता संघटन पर्व कार्यक्रमाच्या अंतर्गत येत्या 15 दिवसांत आणखी 50 लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाणार असल्याचं नुकतंच भाजपकडून स्पष्ट करण्यात आला आहे.

 Mangal Prabhat Lodha
Love Jihad Law : 'लव्ह जिहाद' कायद्यावरून महायुतीत बिनसतंय; आठवलेंचा विरोध, तर अजितदादांचा शिलेदार उतरला समर्थनात

तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी सोबत पाच लाख सक्रिय सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य देखील ठेवले आहे. एका बूथवर पाच सक्रीय सदस्य केले जाणार आहेत. पुढील काही दिवसांमध्ये 50 लाख सदस्य नोंदणीच टार्गेट भाजपाला पूर्ण करायचं असल्याने या कामासाठी भाजपने कॉर्पोरेट कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने सदस्य नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आलं असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 Mangal Prabhat Lodha
BJP Political strategy : CM पदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यामागे मोदी-शहांची असते ही कुटनीती

राज्यातील सरकारमध्ये मंत्री असलेल्या मंगल प्रभात लोढा यांनी देखील सदस्य नोंदणीसाठी संस्थेला काम दिला असल्याचं आरोप करण्यात येत आहे. याबाबत पुण्यामध्ये (Pune) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंगल प्रभात लोढा यांनी खुलासा केला आहे.

मंगल प्रभात लोढा, भाजपकडून सदस्य नोंदणीसाठी कॉन्ट्रॅक्टर नेमले आहेत हे अतिशय खोटा आहे. एकही अशा प्रकारची नोंदणी झालेला सदस्य दाखवावा, अन्यथा ज्यांनी अशापद्धतीचे आरोप केले आहेत त्यांनी माफी मागावी. अशाप्रकारे सदस्या नोंदणीसाठी कोणीही कॉन्ट्रॅक्टर नेमत नाही, जर याबाबत काही माहिती असेल, तर त्याने समोर यावं आणि प्रुफ करावं नाहीतर माफी मागावी, असे आव्हान मंगल प्रभात लोढा दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com