Ambadas Danve News: '...छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ ओरडणे यात फरक!'; दानवेंचा चिमटा

Chhatrapati Shivaji Maharaj's statue collapsed : निवडणुकांच्या तोंडावर अनावरणाची घाई केली की, असे तोंडघशी पडत असतात. हा शिवरायांचा घोर अपमान आहे !, अशा शब्दात दानवे यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राजकोट किल्यावर आठ महिन्यांपुर्वी अनावरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावरून राज्य आणि देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डिसेंबर 2023 मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मोठ्या थाटात अनावरण झाले होते. पण आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला.

यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुतळा कसा असावा? हे पाहायचे असेल तर आमच्या संभाजीनगरात येऊन पहा, प्रतापगडावर जाऊन पहा, असे आवाहन करतानाच शिवरायांच्या कर्तृत्वातून शिकणे आणि छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ` ओरडणे यात फरक असल्याचा टोला दानवे यांनी आपल्या ट्विटमधून लगावला आहे.

शिवरायांचे किल्ले आजही साडेतीनशे वर्षांनंतर ऊन, वारा, पाऊस झेलून ताठ मानेने उभे आहेत. शिवरायांच्या पुतळ्याचे हे डिजाईन एक पावसाळा झेलू शकले नाही. शिवरायांच्या कर्तृत्वातून शिकणे आणि केवळ 'छत्रपती का आशिर्वाद.. चलो चले मोदी के साथ..' ओरडणे, यात फरक आहे. पुतळा कशाला म्हणतात हे आमच्या संभाजीनागरच्या क्रांती चौकात, प्रतापगडावर किंवा शिवतीर्थावर येऊन अगोदर बघावे आणि मग या महत कार्याला हात घालावा.

निवडणुकांच्या तोंडावर अनावरणाची घाई केली की, असे तोंडघशी पडत असतात. (Shivsena) हा शिवरायांचा घोर अपमान आहे !, अशा शब्दात दानवे यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आले होते. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com