Chhatrapati Smabhajinagar Market Committee : नेत्यांची शिष्टाई फळाला, महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे युतीचंही जमलं..

Market Committee : आजपर्यंत १९ जणांनी माघार घेतली, उद्या शेवटच्या दिवशी हा आकडा खूप खाली येण्याची शक्यता आहे.
Chhatrapati Smabhajinagar Market Committee News
Chhatrapati Smabhajinagar Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : गेल्या कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडी होणार का? भाजप-शिंदे युतीचे काय? या चर्चांना उधाण आले होते. छत्रपती संभाजीगनर बाजार समितीची (Chhatrapati Smabhajinagar Market Committee) सत्ता हवी असेल तर रुसवे-फुगवे बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल, याची जाणीव स्थानिक नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही झाली. महाविकास आघाडी अन् तिकडे भाजप-शिंदे गट युतीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

Chhatrapati Smabhajinagar Market Committee News
Nanded Market Committee News : नांदेडात जागा वाटप ठरलं, महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब..

नेत्यांची शिष्टाई फळाला आली असून आता (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी विरुद्ध (Bjp) भाजप-शिंदे युती बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी झुंजणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या (ता.२०) अंतिम मुदत आहे. (Haribhau Bagde) त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आपापल्या इच्छूक, बंड करू पाहणाऱ्यांना माघार घ्यायला लावण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.

पण माघारीची मुदत संपत येत असतांना त्याला आता वेग आला आहे. १८ संचालकांच्या बाजार समितीत १८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आजपर्यंत १९ जणांनी माघार घेतली, उद्या शेवटच्या दिवशी हा आकडा खूप खाली येण्याची शक्यता आहे. यासाठी आज `रात्रीस खेळ चाले`, चा प्रयोग होणार आहे.

महाविकास आघाडीसाठी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी प्रयत्न केले. तर भाजप-शिंदे गटाचे एक पॅनल असावे यासाठी आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह पालकमंत्री संदीपान भुमरे प्रयत्नशील होते. अद्याप आघाडी-युतीची घोषणा झाली नसली तरी उद्या ती केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com