Nanded Market Committee News : नांदेडात जागा वाटप ठरलं, महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब..

Ashok Chavan : मागील निवडणुकीतील संख्याबळ लक्षात घेवूनच अशोक चव्हाण यांनी जागा वाटप केल्याचे सांगितले जाते.
Nanded Market Committee News
Nanded Market Committee NewsSarkarnama

Mahavikas Aghadi : बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने आघाडी-युतीच्या जागा वाटपला वेग आला आहे. (Congress) काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपासून जिल्ह्यात आढावा बैठका घेत सुत्रे हलवली. नांदेड बाजार समितीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे.

Nanded Market Committee News
Bhokar Market Committee News: इच्छुकांची संख्या वाढल्याने चव्हाणांकडून जुन्या संचालकांना थांबण्याच्या सूचना..

तीन्ही पक्षांना किती जागा द्यायचे हे देखील ठरले असून महाविकास आघाडीवर देखील शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. (Nanded) नांदेड बाजार समितीच्या १८ जागांपैकी सर्वाधिक १२ या काॅंग्रेस, तर प्रत्येकी तीन शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचे समजते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज महाविकास आघाडीच्या तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

तर दुसरीकडे भाजप, शिवसेनेचे नेते सक्रीय झाले असून तोडीस तोड उमेदवार देऊन सक्षम पॅनल तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या (ता.२०) शेवटची तारीख असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट असे दोन पॅनल एकमेकांच्या विरुद्ध लढण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत ५१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. नांदेड बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नांदेड, अर्धापूर या दोन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, नोंदणीकृत आडत व व्यापारी, हमाल, मापारी तसेच मुदखेड तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. या बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता राहिली आहे. त्यामुळे काॅंग्रेस प्रणित पॅनलकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूकांची धडपड सुरू आहे.

मागील निवडणुकीतील संख्याबळ लक्षात घेवूनच अशोक चव्हाण यांनी जागा वाटप केल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे भाजप शिवसेना युतीचे जिल्ह्यातील खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, धर्मराज देशमुख, माजी सभापती बाबुराव हेंद्रे यांचे देखील युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. एक सक्षम पॅनल तयार करण्यासाठी आघाडीच्या नाराज व मातब्बर बंडखोरांवर त्यांचा डोळा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com