Chhatrapti Sambhajinagar Loksabha Election : छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्या दोन तासांत 7.52 टक्के मतदान

Loksabha Election 2024 News : पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात 7.52 टक्के मतदान झाले. तर पहिल्या दोन तासांत सकाळी 9 पर्यंत औरंगाबाद मध्य मतदारसंघात 8.5 टक्के मतदान झाले.
Chhatrapti Sambhajinagar Loksabha Election
Chhatrapti Sambhajinagar Loksabha Election Sarkarnama

Loksabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदानाला सुरळीत सुरुवात झाली. सकाळी सात वाजता मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. उन्हाच्या आधीच मतदान करावे यासाठी मतदारांनी सकाळी रांगा लावल्या होत्या.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून पीएमएस (पोलिंग मॉनिटरींग सिस्टिम ) - 24 अॅपद्वारे व वेबकास्टिंगद्वारे मतदानावर लक्ष ठेवून आहेत. (Sambhajinagar Lok Sabha Election News Update)

पहिल्या दोन तासात जिल्ह्यात 7.52 टक्के मतदान झाले. तर पहिल्या दोन तासात सकाळी 9 पर्यंत औरंगाबाद मध्य मतदारसंघात (Loksabha Constituency) 8.5 टक्के मतदान झाले.

पश्चिममध्ये 8.26

पूर्वमध्ये 9.72,

गंगापूरमध्ये 5.68

वैजापूर 6.33

कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये 6.4 टक्के मतदान झाले.

Chhatrapti Sambhajinagar Loksabha Election
Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पुणे, मावळ अन् शिरूरमध्ये सकाळी नऊपर्यंत मतदान किती? वाचा आकडेवारी

सकाळीच मतदार घराबाहेर पडलेले दिसले. नागरीकांमध्ये मतदानाचा उत्साह आहे. नवमतदारांना मतदान करण्याची उत्सूकता होती. मतदान केद्रांबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी होती. मतदारांनी सुरळीत मतदान करण्यात यावे यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती.

सकाळपासूनच मतदारसंघातील नेते मंडळींनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. त्यासोबतच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला. यानंतर बोलताना त्यांनी सांगितले, 'जिल्ह्यात सर्वत्र सकाळी सात वाजता शांततेत मतदानाला सुरुवात झालेली आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे, तुम्ही सर्व मतदारांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट व समृद्ध करावी' असे आवाहन केले.

Chhatrapti Sambhajinagar Loksabha Election
Eknath Shinde News: उत्तर महाराष्ट्रातील 'या' जागेसाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com