Chhatrapati Sambhajinagar Election Candidate : गेल्या महिनाभरापासून संभाजीनगरची जागा कोण लढणार, यावर महायुतीतील भाजप-शिवसेना या दोन पक्षातील नेत्यांचा खल सुरू आहे. बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु दोन्ही पक्षांनी दावा सोडला नाही. अखेर काल राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मुंबईतील रत्नसिंधू या बंगल्यावर शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या मंत्री, खासदार आणि इच्छुकांची एक बैठक पार पडली.
या बैठकीला संभाजीनगरमधून लढण्यास इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे सादीपान भुमरे (Sandipan Bhumare) आणि भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड (Bhagawat Karad) यांच्यासह माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) प्रामुख्याने हजर होते. याशिवाय शिंदे गटाचे शंभूराजे देसाई, दादा भुसे हे मंत्रीही आले होते. या बैठकीत संभाजीनगरच्या उमेदवारीवर चर्चा झाली असून, भुमरे आणि कराड यांच्यात समझोता झाल्याची चर्चा आहे.
संभाजीनगर लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे भागवत कराड यांना पक्षातून अतुल सावे यांच्या माध्यमातून स्पर्धा निर्माण केली जात आहे. भुमरे यांच्या बंगल्यात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संभाजीनगर येथील जाहीर सभेत संभाजीनगरमधून भाजपचे कमळ निवडून पाठवणार का? असा सवाल केला होता. तेव्हापासूनच ही जागा भाजपच (BJP) लढवणार, असा ठाम विश्वास आणि दावा भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून केला जात होता.
परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांनी संभाजीनगरच्या जागेसाठी मोठा दबाव निर्माण केला. त्यामुळे संभाजीनगरच्या जागेवर तडजोड न करण्याची भूमिका शिंदे यांनी कायम ठेवली. लोकसभा निवडणूक जाहीर होऊन तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. याचा विपरीत परिणाम मतदारांवर होऊ नये, यासाठी कालच्या बैठकीत उमेदवारीवर अंतिम निर्णय झाल्याचे बोलले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून Loksabha constituency शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भुमरे हेच लढणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जाते. साधारणतः धूलिवंदनानंतर भुमरेंच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. भुमरे यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत संभाजीनगरमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. एकूणच संभाजीनगरच्या जागेवर सुरू असलेला वाद संपला असल्याचे दिसते.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.