Thane Lok Sabha Election 2024 : ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गटात थेट सामना? विचारेंविरोधात 'हा' नेता मैदानात उतरू शकतो

Thane News : ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम या ठिकाणी खासदार, आमदार आणि मंत्र्यासह एकनाथ शिंदे धुळवड साजरी करणार आहेत. धुळवडीच्या दिवशी ठाणे लोकसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते.
rajan vichre eknath shinde
rajan vichre eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Thane News : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातील जागावाटपावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेची शिंदेंची शिवसेना लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाणेच्या जागेवर भाजपने आपला दावा केला आहे, तर दुसरीकडे उमेदवार देण्याकरता शिवसेना नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात होती. मात्र, ही जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, आमदार प्रताप सरनाईक किंवा रवींद्र फाटक निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात.

ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे ( Rajan vichare ) हे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याबरोबर आहेत, तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बेलापूर, ऐरोली, ठाणे शहर या तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार असून, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवाड्यात शिवसेनेचे आमदार आहेत. मीरा-भाईंदरमध्ये गीता जैन या अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव मोठा असल्याने या मतदारसंघावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, ठाण्याची जागा शिंदेंची शिवसेना लढवेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम या ठिकाणी खासदार, आमदार आणि मंत्र्यासह एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) धुळवड साजरी करणार आहेत. धुळवडीच्या दिवशी ठाणे लोकसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते. लोकसभेच्या जागेसाठी आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ), माजी आमदार रवींद्र फाटक ( Ravindra Phatak ) यापैकी एक नाव घोषित होऊ शकते. ठाकरे गटाच्या विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या विरोधात लढत देण्यासाठी तगडा उमेदवार द्यावा लागणार असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आता रंगू लागली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून ठाणे लोकसभेत लढत होणार आहे. त्यामुळे धुळवडीला कोणाच्या नावाचा रंग उधळला जाईल याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

rajan vichre eknath shinde
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला एकटे पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न?

ठाणे लोकसभेतील विधानसभा आणि आमदार खालीलप्रमाणे...

बेलापूर - आमदार मंदा मात्रे (भाजप)

ऐरोली - आमदार गणेश नाईक (भाजप)

ठाणे शहर - आमदार संजय केळकर (भाजप)

कोपरी-पाचपाखाडी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना)

ओवळा-माजीवाडा - आमदार प्रताप सरनाईक (शिवसेना)

मीरा-भाईंदर - आमदार गीता जैन (अपक्ष )

R

rajan vichre eknath shinde
Pratap Sarnaik : महापालिकेच्या अमाप निधीमुळे आव्हाड पुन्हा आमदार; सरनाईकांचा आव्हाडांवर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com