Eknath Shinde  Sanjay Shirsat
Eknath Shinde Sanjay Shirsatsarkarnama

Sanjay Shirsat on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या शेतात संजय शिरसाट रमले, म्हणाले, 'समाधान देणारे एकमेव...'

Sanjay Shirsat enjoyed Maharashtra CM Ekanath Shinde Farm in Satara District : संजय शिरसाट यांनी एकनाथजी शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मुळगावी साहेबांसह फेरफटका मारून मारून शेती आणि पिकांची पाहणी केली.

Sanjay Shirsat News : लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील पाच टप्पे संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या शेतात रमले आहेत. अगदी राज्य कारभारातून सुट्टी काढत शिंदेंनी शेतातील फळबागांची पाहणी करत काही मशागतीची कामेही केली.आता त्यांच्यासोबत पक्षातील त्यांचे इतर सहकारीही हळूहळू शेतीकडे वळतात की काय? असे वाटू लागले आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट Sanjay Shirsat यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांच्या शेतात आज (शनिवारी) सकाळी फेरफटका मारला. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी प्रत्येक फळाच्या झाडांचे बारकाईने निरीक्षण करत होते. तसेच शिंदे देत असलेल्या सूचना ऐकत होते. मुख्यमंत्र्यांचे हे शेतीवरचे प्रेम पाहून शिरसाट भारावले.

या आगळ्या वेगळ्या अनुभवाबद्दल त्यांनी आपल्या भावना त्यांनी फेसबूकवर व्यक्त केल्या आहेत. आमचे नेते मार्गदर्शक लोकप्रिय मुख्यमंत्री शेतकरी पुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे Eknath Shinde साहेब यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मुळगावी साहेबांसह फेरफटका मारून मारून शेती आणि पिकांची पाहणी केली. साहेबांसोबत संवाद करताना हा संवाद जणू 'संवाद आपलुकीचा, शेती-माती साठी कटिबद्ध राहण्याचा..!' वाटत होता. असे शिरसाट यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Eknath Shinde  Sanjay Shirsat
Sandipan Bhumre On Lok Sabha Result : पहिला नंबर माझाच; खैरे-इम्तियाज यांच्यात दुसऱ्या नंबरसाठी स्पर्धा, भुमरेंचा दावा

एक मुख्यमंत्री हा शेतीची, शेती विषयांची एवढी सखोल, व्यापक माहिती ठेवतो हे आजपर्यंत ऐकून होतो. आज मात्र या अनुभवाची प्रचीती झाली. प्राणीमात्रांवर सुध्दा साहेबांचे तेवढेच प्रेम आहे. गाईंना आपल्या हाताने चारा खाऊ घातला हे पाहताना आपुलकीने मन भरून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतात फेरफटका मारताना चिकू, फणस, सुपारी फळ झाडांची पाहणी केली. आज आदरणीय साहेबांसोबत केलेला हा संवाद एका मुख्यमंत्री सोबत केलेला संवाद नव्हता तर तो शेतीची जाण असणाऱ्या मनगटात दम व छातीत धग असणाऱ्या खऱ्या अर्थाने काळ्या आईचे पांग फेडणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद होता, असा भास होत होता, असे देखील शिरसाट यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Eknath Shinde  Sanjay Shirsat
Lok Sabha Election 2024 : पोलिसांच्या 'या' आदेशामुळे विजयानंतरही कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार; कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com