Hingoli News : लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या दबावामुळे मागे घ्यावी लागली होती. त्यानंतर बाबूराव कदम कोहळीकर या सामान्य चेहऱ्याला उमेदवारी देत मुख्यमंत्र्यांनी वेगळी खेळी केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तर काल प्रचार संपेपर्यंत एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीत विशेष लक्ष दिले. स्वतः शिंदे यांनी बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी तीन सभा घेतल्या. याशिवाय सिनेअभिनेता गोविंदा मंत्रिमंडळातील सहकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांना कामाला लावले. परभणी येथे महादेव जानकर आणि हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त सभाही झाली.
एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रतिष्ठा हिंगोलीत पणाला लागल्याचे चित्र आहे. बाबूराव कदम यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Aashtikar) यांच्याशी असणार आहे. आष्टीकर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोनदा हिंगोलीत सभा घेऊन गेले. प्रचारात आष्टीकर यांनी आघाडी घेतल्याचे चित्र असले तरी महायुतीने बाबूराव कदम यांच्यासाठी शेवटच्या टप्प्यात जोर लावल्याचे दिसून आले.
हिंगोली मतदारसंघांमध्ये विकासाच्या स्थानिक मुद्द्यांबरोबरच मराठा-ओबीसी आरक्षणाचा मतदारांवर प्रभाव असणार आहे. मराठवाड्यातील इतर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जसा मराठा आरक्षणावरून Maratha Reservation समाजाचा रोष सहन करावा लागला तसे चित्र हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी दिसले. एकूणच हिंगोली मतदारसंघाकडे विद्यमान उमेदवाराला बदलून नवा उमेदवार दिल्यामुळे राज्याचे लक्ष असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता इथे एकदा निवडून आलेल्या खासदाराला दुसऱ्यांदा संधी दिली जात नाही. कदाचित याचमुळे हेमंत पाटील Hemant Patil यांची उमेदवारी बदलली असावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.
महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे आता पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे हिंगोलीकर आपल्या मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकतात? हे उद्या मतपेटीत बंद होणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.