Chitra Wagh On Manoj Jarange Patil : जरांगेंच्या टीकेनंतर चित्रा वाघ कडाडल्या! 'काय उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही'..

After Jarange’s criticism, BJP leader Chitra Wagh strongly responded : गेली 27 वर्ष मी राजकारणात, समाजकारणात काम करते. आता मी आमदार आहे त्यांना माहीत नसेल, पण मी आमदार असले काय नसले काय जे काम करायचे ते मी करत रहाणार.
MLA Chitra Wagh On Manoj Jarange Patil News
MLA Chitra Wagh On Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी भाजपाच्या आमदार व महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दोन दिवसांपुर्वी टीका केली होती. ' माझ्या नादाला लागू नको, नाहीत तुझं सगळं गबाळं उचकीन, आमच्या आया-बहीणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे गेली होती' असा थेट हल्ला जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर चढवला होता.

यावर चित्रा वाघ (Chitra Wagh) चांगल्याच संतापल्या असून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना जशास जसे उत्तर दिले आहे. माझा गबाळं आणि जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, अशा शब्दात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पलटवार केला. मनोज जरांगे जे बोलले ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे. मनोज जरांगे गबाळं उचकीन म्हणाले जे उचकायचं ते उचका, मी त्यांना घाबरणारी नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे, असे, आव्हानच त्यांनी दिले.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वापरलेली भाषा भाजप नेत्यांना खटकली. प्रवीण दरेकर, नितेश राणे, चित्रा वाघ व इतर नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत जरांगे यांना सुनावले होते. यापैकी चित्रा वाघ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली होती. माझ्या नादाला लागू नको, नाही तर तुझं सगळं गबाळं उचकीन, तुझी सगळी माहिती संध्याकाळापर्यंत माझ्याकडे येईलच, असा दम भरला होता.

MLA Chitra Wagh On Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil: आता थांबायचं नाही? आरपारची शेवटची लढाई; जरांगेंची मुंबईकडे कूच, पहिला मुक्काम जुन्नरला

यावर माध्यमांनी चित्रा वाघ यांना विचारले असता, ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या आईवर टीका झाली ते महाराष्ट्राला पटणार नाही. आम्हाला तुमच्याबद्दल देखील आदर आहे तुम्ही एका समाजाच्या आरक्षणासाठी मोठं काम करताय. आरक्षण जर कोण देणार तर देवेंद्र फडणवीसच देणार. मनोज जरांगे यांनी त्यांचे शब्द मागे घेतल्याचे म्हटले आहे, तर त्याचे स्वागत आहे. परंतु पुन्हा त्यांच्याकडून अशा भाषेचा वापर होणार नाही, एवढी अपेक्षा आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

MLA Chitra Wagh On Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Chitra Wagh Clash: मनोज जरांगेंनी चित्रा वाघांना झाप झाप झापलं; म्हणाले,'माझ्या नादी लागलीस,तर तुझं सगळं गबाळ...'

मी बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होते म्हणून थांबले होते. ते जे बोलले ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे. दुसरे कोणी मुख्यमंत्री असते आणि त्यांच्या आईला कोणी बोलले असते तरी आम्ही सहन केले नसते. मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली, गबाळं उचकीन म्हणाले. जे उचकायचं ते उचका, मात्र मी काही त्यांना घाबरणारी नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे.

MLA Chitra Wagh On Manoj Jarange Patil News
Bjp Minister: "आम्ही निवडणूक आयोगापेक्षाही चांगलं काम करतोय"; भाजपच्या मंत्र्याचा दावा

गेली 27 वर्ष मी राजकारणात, समाजकारणात काम करते. आता मी आमदार आहे त्यांना माहीत नसेल, पण मी आमदार असले काय नसले काय जे काम करायचे ते मी करत रहाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा, कोणाच्या आया बहिणींना मध्ये आणू नका एवढेच मला सांगायचं आहे. आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून आलोय हे जरांगे ना कुठे माहिती आहे. घाणेरड्या पद्धतीने मला शिवीगाळ केली गेली, जे करायच ते करा मला फरक पडत नाही माझं नाव चित्रा वाघ आहे, माझं काम मी करत राहणार असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com