Beed Crime News : मुख्यमंत्री फडणवीस यांची सभागृहात घोषणा अन् सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल!

CID team in Massajog-SIT will also be appointed : मुख्यमंत्री सभागृहात ही घोषणा करत नाही, तोच आजच सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल झाले. कालपासून बीडमध्ये असलेल्या पथकाने आज देशमुख कुटुंबियांची मस्साजोग येथे जाऊन भेट घेतली.
Santosh Deshmukh News
Santosh Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे (Beed Crime News) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरून एकमेकांवर तुटून पडले आहेत. अशातच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख खून प्रकरणाचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात सभागृहात चकमकही उडाली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचे सांगत त्यासाठी एसआयटी स्थापन करणार असल्याचेही सांगितले होते.

Santosh Deshmukh News
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या वर्चस्वाला अखेरच्या क्षणी दिल्लीचा लगाम अन् संतुलन बिघडले!

मुख्यमंत्री सभागृहात ही घोषणा करत नाही, तोच आजच सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल झाले. कालपासून बीडमध्ये असलेल्या पथकाने आज देशमुख कुटुंबियांची मस्साजोग येथे जाऊन भेट घेतली. मागच्या आठवड्यात सोमवारी (ता. 9) संतोष देशमुख यांचे केज तालुक्यातून अपहरण करुन त्यांचा खुन करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करुन केज पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते.

Santosh Deshmukh News
Beed Firing : 'बीडचा बिहार झालाय' म्हणणाऱ्या आमदाराच्या कार्यकर्त्यांनेच केला घरात घुसून गोळीबार...

तर तिकडे संसदेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या हत्या प्रकरणाला वाचा फोडली. या घटनेतील दोषींना फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उप अधीक्षक गुजर हे करत आहेत. सोमवारी सीआयडीचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे अधीक्षक सचिन पाटील यांचे पथक मस्साजोगला दाखल झाले.

Santosh Deshmukh News
Maharashtra Winter Assembly Session : आरोपी 'बाप तो बाप रहेगा'चे पोस्टर झळकावतायेत, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का?

अपहरण घटनेचे प्रत्यक्षदर्शी व फिर्यादी व सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी या पथकाने चर्चा केली. या घटनेतील काही पैलूंबाबत सीआयडीने धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात-धर्म-पक्ष राजकीय संबंध याचा विचार न करता दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आज सभागृहात दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com