Sharad Pawar In Action News : बैठकीत जालना लोकसभा मतदारसंघावर दावा अन् पवार थेट जिल्ह्यात...

Ncp : राष्ट्रवादीचा एकही आमदार नसतांना काॅंग्रेसकडे असलेल्या जालना मतदारसंघावर राष्ट्रवादीकडून दावा का केला जातोय?
Sharad Pawar In Action News
Sharad Pawar In Action NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : पुणे येथे झालेल्या राज्यातील लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जालना लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला. (Sharad Pawar In Action News) राजेश टोपे यांना उमेदवारी द्या, अशी मागणीही केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार जालना जिल्ह्यात दाखल झाले.

Sharad Pawar In Action News
Sharad Pawar's Friendship: मैत्री जपणारा नेता, मित्र आजारी असल्याचे समजताच पवारांची हाॅस्पीटलमध्ये धाव..

जाफ्राबादच्या (Ncp) राष्ट्रवादीच्या महिला नगराध्यक्षांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांची कैफियत अश्रूंना वाट मोकळी करत पवारांसमोरच मांडली होती. या निमित्ताने ते थेट जाफ्राबादमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला. (Jalna) एवढ्या तडकाफडकी पवारांनी जालन्याचा दौरा केल्याने अेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आले आहेत. (Sharad Pawar) आघाडीत हा मतदारसंघ काॅंग्रेसकडे आहे, मात्र त्यांना सातत्याने पराभवाचे तोंड पहावे लागत आहे. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरवा असा आग्रह राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पुण्याच्या बैठकीत राष्ट्रवादीकडे धरला होता.

या पार्श्वभूमीवर पवारांच्या जालना दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होणार असल्याचे बोलले जाते. जालना जिल्हा दौऱ्यात पवारांसोबत माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची उपस्थिती होती.

या दोघांकडे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जाते. विशेष म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची पाटी कोरी आहे. टोपे यांचा घनसावंगी मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नसतांना काॅंग्रेसकडे असलेल्या जालना मतदारसंघावर राष्ट्रवादीकडून दावा का केला जातोय? याबद्दल देखील चर्चा होतांना दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com