Devendra Fadnavis Beed Visit : अजितदादांनी धक्का दिलेल्या आमदार धसांना 'सीएम' फडणवीस ताकद देणार; बीड दौर्‍याची तारीख ठरली

Ajit Pawar Vs Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे.फडणवीसांच्या भेटीनंतरही धस यांनी आपल्या आरोपांचा धडाका कायम ठेवला आहे.
 Suresh Dhas Devendra Fadnavis Ajit Pawar
Suresh Dhas Devendra Fadnavis Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Beed News : सरपंच हत्याकांडानंतर दीड महिन्यांपासून राज्यासह देशपातळीवर चर्चेत आलेल्या बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी कायदा हातात घेणार्‍यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. पण एकीकडे अजितदादांच्या दौरा होत नाही, तोच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) बीडचा दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बीडमध्ये पाऊल ठेवताच पहिला दणका मंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट करणार्‍या भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनाच दिला. या दोन्ही आमदारांना जिल्हा नियोजन समितीतून घरचा रस्ता दाखवत दादांनी जो संदेश दिला त्याचे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे.आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बीडचा दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी ते धस यांचा पाठबळ देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजितदादा आणि फडणवीसांचा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख हत्येप्रकरणानंतर बीडमधील भ्रष्टाचार,दहशत,गुन्हेगारी जगताची काळी बाजू समोर आणत खळबळ उडवून दिली आहे. तसेच त्यांनी तपासयंत्रणांना काही महत्त्वाचे पुरावे पुरवण्याचे कामही चोख बजावले आहेत. आता धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यानंतर धस यांना अजित पवारांनी खालचे लोक म्हणून फटकारलं होतं.

 Suresh Dhas Devendra Fadnavis Ajit Pawar
Dhananjay Munde News : माझ्या काळात बीडचा विकास, आता सुरू असलेली बदनामी थांबवा; धनंजय मुंडेंचे अजितदादांना साकडे!

पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पोहचण्याआधीच भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी (ता.30) संध्याकाळी पत्रकार परिषद घेत बीड जिल्ह्यातला 73 कोटींच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत तत्कालीन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बीडमध्ये पाऊल ठेवताच अजित पवारांनी धस यांना मोठा धक्का देताना त्यांना जिल्हा नियोजन समितीतून हटवलं होतं.विशेष म्हणजे धस यांनी अजितदादांना बैठकीवेळी एक पेनड्राईव्ह दिला.

भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे.फडणवीसांच्या भेटीनंतरही धस यांनी आपल्या आरोपांचा धडाका कायम ठेवला आहे.फडणवीसांनी ठरवलं असतं,तर ते धसांना रोखू शकले असते.पण त्यांनी धसांना पूर्ण मोकळीक दिली.त्यामुळे धसांच्या लढ्याला आणखी धार चढली.

 Suresh Dhas Devendra Fadnavis Ajit Pawar
Solapur News : आमचा काय छळ करायचा तो करा; आम्ही आता शांत बसणार नाही; पवारांच्या आमदाराचा इशारा

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या पाच फेब्रुवारीला बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या हस्ते बीडमधील विविध विकासकामांचं भूमिपूजन स होणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस हे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातही जाणार असून तेथील कुंटेफळ तलावाच्या कामाचं उद्घाटन ते करणार आहे. याचबरोबर ते बीडमधील कायदा सुव्यवस्थेचाही आढावा घेणार आहेत.

भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री येत्या 5 तारखेला आष्टीला येणार आहे. मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांसाठी मतदारसंघात येणार आहेत. अजितदादांपाठोपाठ आता फडणवीसांचाही बीड दौरा होत असल्यानं राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com