Cm Eknath Shinde : बैठक पाटण्यात घ्या, नाहीतर चाटण्यात.. काही फरक पडत नाही ; आम्ही कामाने उत्तर देवू..

Shivsena : हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, त्यांच्या अडचणी माहिती असणारे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
Cm Eknath Shinde, News Nanded
Cm Eknath Shinde, News NandedSarkarnama

Nanded News : राज्यातील शेतकरी, सर्वसामान्यांचा विचार करणारे, त्यांच्या हितासाठी झटणारे हे डबल इंजीनचे सरकार आहे. `सरकारी काम आणि सहा महिने थांब` ही संकल्पना मोडीत काढणारे आणि `हेलपाटे` हा शब्द काढून टाकून वेळप्रसंगी नियम बाजूला ठेऊन शेतकरी, सर्वसामान्यांना सर्वतोपरी मदत करणारे हे सरकार आहे. (Cm Eknath Shinde, News Nanded) त्यामुळे विरोधकांना किती बैठका घ्यायच्या त्या घेऊ द्या. पाटण्याला घेऊ द्या नाही तर चाटण्याला घेऊ द्या? काही फरक पडत नाही. विरोधकांना आम्ही कामानेच उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

Cm Eknath Shinde, News Nanded
Raosaheb Danve News : भाजप सर्वात शक्तीमान पक्ष, संधीचं सोनं करा...

`शासन आपल्या दारी` या योजने अंतर्गत मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात अनेक विषयांचा उहापोह केला. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून त्याचे स्वागत करूयात, शेतकरी हा अन्नदाता आपले माय बाप आहेत. (Nanded) हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती असणारे सरकार असल्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रसंगी नियम बाजूला ठेऊन गेल्या अकरा महिन्यात दहा हजार कोटीची मदत दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपये दिले. (Marathwada) सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजून यासाठी दीड हजार कोटींची तरतूद केली. पिक विमा केवळ एक रुपयांत भरून देण्याचा निर्णय घेतला. केंद्राप्रमाणे पीएम किसान सन्मान योजनेत राज्य सरकारने सहा हजार रुपये देऊन रक्कम दरवर्षी बारा हजार रूपये केली. सर्वसामान्यांसाठी धाडसी निर्णय सरकारने घेतले. ७५ हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले.

सरकार सत्तेवर आल्यानंतर २९ योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन एक हजार आठशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे सहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर नांदेड आणि हिंगोलीसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी दिला. नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प पूर्ण करून रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सहकार्य करेल. नांदेडहून जाणारा समृद्धी महामार्ग तसेच हिंगोलीच्या हळद प्रकल्पाला बळकटी दिली जाणार आहे. नांदेडला कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी देखील लवकरच निर्णय घेऊ.

बिजेगाव (ता. उमरी) येथील पुर्नवसनाचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, राम पाटील रातोळीकर, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, राजेश पवार, श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशीकांत महावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com