Jalna Maratha Protest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सायंकाळी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी येणार होते. या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम देखील जाहीर झाला होता. (Maratha Reservaiton) त्यानूसार सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री चिकलठाणा विमानतळावर येणार होते. तिथून हेलिकाॅप्टरने ४ वाजून ४० मिनिटांनी ते अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरून मोटारीने ४ वाजून ५० मिनिटांनी अंतरवाली सराटीत दाखल होणार होते.
त्यानंतर ४० मिनिटांच्या भेटीनंतर ते पुन्हा टोपेंच्या साखर कारखान्यावर आणि तिथून हेलिकाॅप्टरने औरंगाबाद मार्गे सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होणार होते. (Maratha Reservation) परंतु साडेसहा वाजेपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री औरंगाबादेतच दाखल झालेले नव्हते. त्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाल्याची चर्चा माध्यमांमधून सुरू झाली.
इकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Gurdian Minister) हे देखील या दौऱ्यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. भुमरे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा अजून तरी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याबद्दल काही माहिती नाही, मी माहिती घेतो, असे उत्तर देत त्यांनी अधिक बोलणे टाळले. (Shivsena) शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.
शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनीही आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या संदर्भात किंवा शिष्टमंडळ कधी भेटणार याची माहिती नसल्याचे सांगत, मला काही विचारू नका, असे म्हटले. दरम्यान, जरांगे यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे आणि अर्जून खोतकर यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.