Ashok Chavan News : नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण-अजित गोपछडे यांच्यात स्पर्धा! दिल्लीत स्वतंत्रपणे मंत्र्यांच्या भेटीगाठींवर जोर

Ashok Chavan and Dr. Ajit Gopchade engage in a competition for the development of Nanded, with separate meetings held in Delhi to discuss future plans. : नांदेड-मुंबई थेट विमानसेवेसाठी चव्हाण यांची केंद्रीय मंत्री नायडू यांच्यासोबत चर्चा झाली.
Ashok Chavan-Ajit Gopchade News
Ashok Chavan-Ajit Gopchade NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : भाजपाच्या राज्यसभेतील दोन खासदारांमध्ये सध्या विकास कामांवरून चांगलीच स्पर्धा लागली आहे. राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार अशोक चव्हाण, डाॅ. अजित गोपछडे यांनी दिल्लीतील भेटीगाठींवर जोर देत स्वतंत्रपणे मंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा गोपछडे यांनी एका भाषणात अशोकराव तुम्ही हळूहळू अजगरासारखे मोठे व्हाल, अशी भिती व्यक्त केली होती. या निमित्ताने यांची चर्चाही होत आहे. विकास कामांसाठीची स्पर्धा चांगली आहे, परंतु यातून कुरघोडीचे राजकारण होऊ नये, हीच नांदेडकरांची अपेक्षा आहे.

खासदार अजित गोपछडे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नांदेड (Nanded) आणि मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी केली. या शिवाय शेतकऱ्यांसाठी नांदेड येथे आयसीएआरच्या संशोधन केंद्राची शाखा सुरु करावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर नुकतीच अशोक चव्हाण यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री नायडू यांची भेट घेऊन नांदेड-मुंबई थेट विमान सेवा सुरु करण्याची मागणी केली.

नांदेड-मुंबई थेट विमानसेवेसाठी चव्हाण यांची केंद्रीय मंत्री नायडू यांच्यासोबत चर्चा झाली. नांदेडच्या श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासाठी थेट हवाई सेवा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झालेल्या या चर्चेत चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेड-मुंबई थेट विमानसेवेसाठी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे प्रमुख अडथळे असल्याचे नमूद केले.

Ashok Chavan-Ajit Gopchade News
Ashok Chavan-Raosaheb Danve In Assembly : अशोक चव्हाण-रावसाहेब दानवे यांना विधिमंडळाची भुरळ! अधिवेशन काळात दिली भेट..

नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, याकडे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच, त्यानंतर नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नायडू यांनी या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नांदेड-मुंबई थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Ashok Chavan-Ajit Gopchade News
Ajit Gopchade News : शेतकरी आत्महत्या अन् दुष्काळग्रस्त मराठवाडा हा कलंक पुसायचायं! अजित गोपछडेंचे थेट अमित शहांना साकडे

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नांदेड विमानतळावरील सुविधा सुधारण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून येथे दोन हवाई वाहतूक व्यवस्थापन अधिकारी आणि एक संचार, दिशादर्शन व देखरेख यंत्रणा अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या नवीन नियुक्त्यांमुळे विमानसेवेचा विस्तार शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com