Ashok Chavan-Raosaheb Danve In Assembly : अशोक चव्हाण-रावसाहेब दानवे यांना विधिमंडळाची भुरळ! अधिवेशन काळात दिली भेट..

Ravsaheb Danve and Ashok Chavan visit the legislature, reminiscing about old memories and discussing past experiences. : एकूणच कधी काळी विधीमंडळाची सभागृहा गाजवलेल्या अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या हजेरीने त्यांना आपला काळ निश्चितच आठवला असणार.
Ashok Chavan-Raosaheb Danv In Assembly News
Ashok Chavan-Raosaheb Danv In Assembly NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : कुठल्याही राजकीय नेत्याचा प्रवास हा गावातून सुरू होतो आणि कालांतराने ते विविध टप्पे पार करत स्थिरावतात. तर कधीकधी राजकारणातील चढउतारामुळे या नेत्यांना बॅकफूटवरही यावे लागते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपाचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची अशीच काहीसी अवस्था झाली आहे.

रावसाहेब दानवे यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून पराभव झाला. तर अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवत त्यांचे पुनर्वसन केले. दिल्लीच्या राजकारणात फारसा रस नसलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना ही तडजोड करावी लागली. पण या बदल्यात त्यांनी कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आणत आमदार केले.

दुसरीकडे दोनवेळा आमदार, पाचवेळा खासदार, दोनदा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अशी महत्वाची पद भुषवलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) मात्र सध्या निवांत आहे. त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार संतोष दानवे यांची हॅट्रीक आणि कन्नड विधानसभा मतदारसंघातून कन्या संजना जाधव यांची विधानसभेती एन्ट्री ही दानवे यांच्यासाठी दिलासा देणारी ठरली. आपण विधानसभा, परिषद, राज्यसभेवर जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे.

Ashok Chavan-Raosaheb Danv In Assembly News
Raosaheb Danve News : कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात रावसाहेब दानवे झाले आचारी! पोहे बनवून सगळ्यांना खाऊ घातले..

पण 2029 मध्ये पक्षाने संधी दिली तर पून्हा लोकसभा लढवण्याची तयारी असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मध्यंतरी म्हटले होते. त्यामुळे सध्या तरी दानवे यांच्या पुनर्वसनाचा विषय वरिष्ठ पातळीवर नाही. असे असले तरी दानवे पक्षाच्या बैठका, मेळावे, कार्यक्रमांमध्ये हिरारीने सहभागी होत आहेत. दोनवेळा आमदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांनी नुकतीच विधिमंडळाला भेट दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान, ते दोनदा विधानभवनात गेले होते. इथे आले की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो असे ते सांगतात.

Ashok Chavan-Raosaheb Danv In Assembly News
Ashok Chavan On PM Modi : दहा वर्षात भारताचा जीडीपी शंभर पटीने वाढला! अशोक चव्हाण यांच्याकडून नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने..

तर खासदार अशोक चव्हाण यांनीही आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासोबत विधिमंडळाला भेट दिली. दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री, अनेकदा मंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना अजूनही विधानसभा खुणावतेयं, अशी चर्चा त्यांच्या या भेटीनंतर सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर या आपल्या पारंपारिक मतदारसंघाचे दिवंगत नेते शंकराराव चव्हाण, अशोक चव्हाण, अमिता चव्हाण आणि आता श्रीजया चव्हाण प्रतिनिधित्व करत आहेत.

Ashok Chavan-Raosaheb Danv In Assembly News
Bjp News : मुस्लिमांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केली भाजपची भूमिका स्पष्ट; म्हणाले, 'विरोधात...'

चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी यानिमित्ताने राजकारणात सक्रीय झाली आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या लेकीचे कामकाज आणि मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आपल्या अनुभवाची शिदोरी या निमित्ताने श्रीजया चव्हाण यांना दिली. श्रीजया चव्हाण यांच्यासोबत अशोक चव्हाण यांनी विधानभवनात एन्ट्री केल्यानंतर या बाप-लेकीची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. एकूणच कधी काळी विधीमंडळाची सभागृहा गाजवलेल्या अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या हजेरीने त्यांना आपला काळ निश्चितच आठवला असणार.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com